IFFI 2023: भारतीय डॉक्टरने वाचवला हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा-जोन्स यांचा जीव; वाचा सविस्तर...

कॅथरीन यांनी विमान प्रवासात दोनदा पाहिला होता 'हा' भारतीय चित्रपट
Catherine Zeta-Jones in IFFI 2023:
Catherine Zeta-Jones in IFFI 2023:Dainik Gomantak

Catherine Zeta-Jones in IFFI 2023: गोव्यातील 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये हॉलीवूड अभिनेता मायकल डग्लस यांना सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

या वेळी डग्लस यांची पत्नी आणि हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स देखील उपस्थित होत्या. दरम्यान, तत्पुर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कॅथरीन यांनी भारताविषयी आणि भारतीय चित्रपट, कलावंत यांच्याविषयी अनेक गोष्टी उलगडल्या.

कॅथरीन झेटा-जोन्स म्हणाल्या की, भारताबाबत मी ही गोष्ट कधीही सांगितलेली नाहीय पण माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आणि गंभीर आहे. एका भारतीय डॉक्टरने माझा जीव वाचवला होता. जेव्हा मी केवळ 18 महिन्यांची होते तेव्हा माझ्यावर Tracheotomy शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

त्यामुळेच मला नेहमी आश्चर्य वाटते की जेव्हा-जेव्हा मी भारतात येते तेव्हा मला घरी आल्यासारखे वाटते. आज मी जी काही आहे किंवा येथे आले आहे ते युनायटेड किंग्डमधील त्या भारतीय डॉक्टरच्या बुद्धिमत्तेमुळेच आहे, असेही त्या म्हणाल्या.

Catherine Zeta-Jones in IFFI 2023:
IFFI 2023: फोर प्ले, क्लायमॅक्स आणि पॉर्न! 'इफ्फी'त हॉलीवूडस्टार मायकल डग्लसकडून अश्लील कॉमेंट्स...

दरम्यान, Tracheostomy ही एक शस्त्रक्रिया आहे. ज्यात मानेमध्ये छिद्र पाडून थेट श्वसननलिकेला जोडले जाते. त्याद्वारे नाक आणि तोंडाद्वारे श्वासोच्छवासाला पर्याय निर्माण केला जातो.

भारतीय चित्रपटांविषयी कॅथरिन म्हणाल्या की, मला भारत आणि भारतातील लोक आवडतात. मी भारतीय सिनेमाची खूप मोठी चाहती आहे. माझी मुले 'ओम शांती ओम' पाहत मोठी झाली आहेत. एकदा नाही तर अनेकदा. खूप नाही पण अनेक चित्रपट मी पाहिलेत.

मला आवडलेला चित्रपट म्हणजे द लंचबॉक्स. हा माझा ऑलटाईम फेव्हरिट मुव्ही आहे. हा चित्रपट मला खूप भावला. त्यातील अभिनय आणि दिग्दर्शन खूप छान आहे. ही एक भारतीय कथा आहे पण ती जगभरातील स्त्री-पुरूषांना कनेक्ट करणारी आहे.

एक महिला म्हणून ही कथा मला भावली. मी हा चित्रपट विमान प्रवासात पाहिला आणि तेही दोन वेळा. मी माझ्या एजंटला विचारले होते की मी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भेटू शकते का आणि मी भेटले देखील. हे माझ्यासाठी खूप खास होते, असेही कॅथरीन म्हणाल्या.

Catherine Zeta-Jones in IFFI 2023:
IFFI 2023: मी मुलीसोबत आलोय, कॉलगर्ल सोबत नाही; 'इफ्फी'मध्ये अभिनेते रणजीत यांनी सांगितला किस्सा...

कॅथरीन या हॉलिवुडमध्ये चार दशकांपासून कार्यरत आहेत. या कारकिर्दीत त्यांनी अकादमी पुरस्कार तथा ऑस्कर, ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि टोनी पुरस्कार जिंकला आहे.

ओशन्स ट्वेल्व, शिकागो, ट्रॅफिक, द मास्क ऑफ झोरो आणि नो रिझर्वेशन हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. अलीकडेच नेटफ्लिक्सच्या वेन्सडे या हॉरर सीरीजमध्ये त्यांनी मॉर्टिशिया अॅडम्सची भूमिका साकारली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com