Rawanfond Bridge: 'रावणफोंड उड्डाणपूल पूर्णपणे खुला करा'! नागरिकांची मागणी; गैरसोय होत असल्याने लोकांत नाराजी

Rawanfond Road: हा उड्डाणपूल सहापदरी करण्याचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम मिळालेल्या कंत्राटदाराने खांब उभारण्याचे काम सुरु केले आहे.
Rawanfond road development
Rawanfond road developmentDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: सहा महिन्यांपूर्वी रावणफोंड येथील उड्डाणपुलाचा कठडा कोसळला होता. त्यामुळे हा उड्डाणपूल तात्पुरता बंद करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्याने कोसळलेला कठडा दुरुस्त केला. सहा महिन्यांपासून हा पूल छोट्या वाहनांसाठी खुलाही झाला मात्र, अवजड वाहनांना अजून परवानगी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे केपे, सावर्डे, सांगे येथील बस वाहतुकीच्या मार्गात बदल केल्याने लोकांचे हाल होत आहे. हा पूल पूर्णपणे खुला करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोसळलेला कठडा दुरुस्त केलेला आहे मग अवजड वाहनांची वाहतुक का रोखली, जर वाहतुकीसाठी पूल योग्य नसेल तर सरकारतर्फे तसे निवेदन जारी का केले जात नाही, असा प्रश्न नागरिक महेश नायक यांनी उपस्थित केला आहे.

हा उड्डाणपूल सहापदरी करण्याचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम मिळालेल्या कंत्राटदाराने खांब उभारण्याचे काम सुरु केले आहे. जर रस्ता पूर्णपणे खुला केल्यास या कामास अडथळा येत असेल तर सरकारने तसेही स्पष्ट करावे, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. उड्डाण पुलाचे रुंदीकरण होईपर्यंत अवजड वाहनांसाठी रस्ता बंद ठेवला जाईल तर तसे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात, खात्याकडून मात्र काहीच प्रतिक्रीया देण्यात आली नाही.

Rawanfond road development
Rawanfond: रावणफोंड उड्डाणपुलाचा खर्च 21 वरून 54 कोटींवर! मुख्‍यमंत्री, मडगावच्‍या आमदारांनी खुलासा करावा; काँग्रेसचा आरोप

विद्यार्थ्यांचे हाल

उड्डाणपुलावरून बस वाहतुक बंद असल्याने विद्यार्थ्यांचे व पुलाच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना मडगाव शहरात यावे लागते. त्यांचे हाल होत आहे. त्यांना मोठा वळसा घालून जावे लागत असल्याचे नागरिकाने सांगितले. उड्डाणपूल रुंदीकरणाचे काम मंदावलेले आहे, त्याला गती देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. जर हा उड्डाण पूल पूर्णपणे खुला करण्यास आणखी विलंब झाला तर सर्व नागरिक एकत्र येऊन जाहीर निषेध करतील, अशी भूमिका आता परिसरातील नागरिकांनी घेतली आहे.

Rawanfond road development
Salcette: रावणफोंड येथील रेल्वे पुलाचा जोडरस्ता हरवला झुडपात...! पादचाऱ्यांच्याही जिवाला धोका, झुडपे हटविण्याची नागरिकांची मागणी

संबंधितांनी लक्ष द्यावे

सहा महिन्यांपासून अवजड वाहतूक रोखण्यात आली आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. संबंधित विभागाकडून स्पष्टीकरणही दिले गेलेले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या नागरिकांनी या प्रकाराकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com