Goa Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! सारमानस धक्क्यावर कार थेट नदीत कोसळली, पण...

Sarmanas Ferry Wharf Car Accident: फेरीबोटीतून कार मागे घेत असताना ती धक्क्यावरून मागे सरकत नदीपात्रात घसरली.
Goa Accident
Sarmanas Ferry Wharf Car AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: फेरीबोटीतून कार मागे घेत असताना ती धक्क्यावरून मागे सरकत नदीपात्रात घसरली. मात्र, कार चिखलात रुतल्याने ती पाण्यात बुडण्यापासून वाचली. कारमधील दाम्पत्यही सुखरूप बचावले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास सारमानस फेरीधक्क्यावर घडली. कारमध्ये शिरदोन येथील वासुदेव कुंकळेकर (४०) आणि त्यांची पत्नी तेजा कुंकळेकर (३५) हे दाम्पत्य होते.

Goa Accident
Goa Road Accident: 'थार'की मृत्युचा सापळा? आठवड्यात तिघांचा बळी, पाच महिन्यांत 101 रस्ते अपघाती मृत्यू

या घटनेत कारचे काही प्रमाणात नुकसान झाले. सहा महिन्यांपूर्वी, म्हणजेच गेल्या ३ नोव्हेंबर रोजी, सायंकाळी अशाच प्रकारे एक कार थेट पाण्यात गेली होती. त्या घटनेत एक युवा अभियंता बचावला होता. सहा महिन्यांनंतर घडलेली ही दुसरी घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी वासुदेव कुंकळेकर हे आपल्या ''स्विफ्ट'' कारमधून (क्र. जीए-०३-व्हाय-६१२८) टोंक-सारमानस जलमार्गावरील फेरीबोटीतून सारमानसच्या दिशेने येत होते. कारमध्ये त्यांची पत्नीही होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव कुंकळेकर हे पत्नीसह माठवाडा-पिळगाव येथील आपल्या सासरवाडीला निघाले होते. फेरीबोट सारमानस फेरीधक्क्याला लागल्यानंतर वासुदेव हे आपली कार रिव्हर्समध्ये फेरीधक्क्यावर घेत होते. अचानक त्यांचा पाय एक्सलेटरवर पडल्याने कारवरील नियंत्रण सुटले. कार वेगाने मागे जाऊन नदीकाठावरील खांबाला धडकली आणि नदीपात्रात घुसली.घटना घडली त्यावेळी ओहोटी असल्याने कार पाण्यात न जाता चिखलात रुतली.

Goa Accident
Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

जवानांची कार्यतत्परता

ही घटना घडली त्यावेळी अग्निशमन दलाचे जवान अर्जुन धावस्कर फेरीधक्क्यावर उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तेथे उपस्थित स्थानिक व प्रवाशांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले.डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाचे उपअधिकारी भारत गावस यांच्या नेतृत्वाखाली चालक-ऑपरेटर कपिल गावस यांच्यासह लवशीन पिल्लाई, संदीप गावस, सतीश डेगवेकर आणि विशांत वायंगणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश मिळविले.डिचोली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

FDA Raids: तूप-जिऱ्याच्या पावडरला 'एफडीए'चा दणका; 5 निकृष्ट उत्पादनांवर तात्काळ विक्रीबंदी, बाजारातील साठा मागे घेण्याचे आदेश
Goa River Pollution
Karapur One Goa Project Protest
Shivaji Maharaj Statue Goa High Court Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com