Cape News : भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास संविधानावर घाला : विरियातो

Cape News : कुडचडे येथे कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन
Cape News
Cape News Dainik Gomantak

Cape News :

केपे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या देशाचे संविधान लिहिले व यात सर्व देशवासीयांना समान हक्क दिला पण आता आमच्या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करीत आहे.

परत भाजप सत्तेवर आल्यास ते आमचे संविधान बदलण्यास मागे राहणार नाहीत. त्यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे, असे काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

कुडचडे येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्‍ता, आपचे प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Cape News
Goa College of Agriculture : गोवा कृषी महाविद्यालयात गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण

यावेळी पाटकर म्हणाले, काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या काही आमदाराकडे देव बोलतो पण आमच्याकडे देव बोलत नाही तर देव आमच्या पाठीशी आहे असे अमित पाटकर यांनी सांगितले.

भाजपचा खासदार श्रीपाद नाईक यांनी पतंजलीकडे साठगाठ करून करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे, असा दावा केला. तसेच कुडचडे मतदारसंघात काँग्रेस पक्षाला आघाडी मिळणार हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

खाणप्रश्‍नी फसवणूक : आलेमाव

भाजप लोकांना खाण व्यवसाय सुरू करणार असे आश्वासन देऊन फसवत आहे पण लोक त्यांना आता बळी पडणार नाहीत असे युरी अलेमाव यांनी सांगितले. खाण व्यवसाय बंद पडण्यास स्व. मनोहर पर्रीकर जबाबदार असून पस्तीस हजार कोटींचा घोटाळा झाला होता असे जे त्यांनी सांगितले होते तो एक जुमला होता असे आलेमाव यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com