Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

American woman arrested Goa drugs case: दक्षिण गोव्यातील वार्का येथे अंमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे.
American woman arrested Goa drugs case
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

कोलवा: दक्षिण गोव्यातील वार्का येथे अंमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, कोलवा पोलिसांनी एका अमेरिकन महिलेला अटक केली आहे. सुसान डेबोरा अपोलो (६७) असे या संशयित विदेशी महिलेचे नाव असून, तिला हळदोणा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

तपासाची चक्रे फिरली आणि 'सुसान' जाळ्यात अडकली

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वार्का येथील एका फ्लॅटवर छापा टाकून प्रतिक बर्मन (४१) आणि आकाश सजीत (३६) या दोन तरुणांना अटक केली होती. त्यांच्याकडून २ लाख ५०० रुपये किमतीचे एमडीएम (MDMA) आणि चरस जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी या अंमली पदार्थांचा पुरवठा सुसान डेबोरा हिने केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून सुसानला हळदोणा येथून बेड्या ठोकल्या.

American woman arrested Goa drugs case
Goa Drug Case: 'वार्का'त फ्लॅटवर छापेमारी! 2 लाखांच्या ड्रग्जसह दोघे ताब्यात; गोवा पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

'बर्थडे पार्टी'च्या नावाखाली ड्रग्जचा बाजार

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक आणि आकाश हे एका वाढदिवसाच्या पार्टीचे नियोजन करत होते. या 'बर्थडे पार्टी'मध्ये वापरण्यासाठी आणि वाटण्यासाठीच हे अंमली पदार्थ मागवण्यात आले होते. सुसान डेबोरा ही गेल्या काही काळापासून या व्यवसायात सक्रिय असावी, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. ती अंंमली पदार्थांच्या वितरणाचे मुख्य दुवा असल्याचे तपासात समोर येत आहे.

संशयितांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, प्रतिक बर्मन आणि आकाश सजीत या दोघांनाही न्यायालयाने (Court) चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस त्यांच्याकडून हे अंमली पदार्थ कोठून आले आणि त्यांचे मोठे रॅकेट गोव्यात कार्यरत आहे का, याचा शोध घेणार आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित सुसान हिचीही चौकशी सुरू असून, तिच्या व्हिसा आणि पासपोर्टची वैधताही तपासली जात आहे.

American woman arrested Goa drugs case
Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

पोलीस पथकाची कामगिरी

ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपनिरीक्षक प्रथमेश महाले या प्रकरणाचा पुढील तांत्रिक आणि मैदानी तपास करत आहेत. अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई कोलवा पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com