Ghumat स्पर्धेत शांतादुर्गा बोडगेश्वर मंडळाची बाजी

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त पणजी सम्राट क्लबच्या सहाय्याने महिला घुमट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
Ghumat Competition
Ghumat CompetitionDainik Gomantak

Ghumat Aarti Competition: खोर्ली म्हापसा येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त श्री सिध्दीविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पणजी सम्राट क्लबच्या सहाय्याने आयोजित निमंत्रितांच्या महिला घुमट आरती स्पर्धेत श्री शांतादुर्गा बोडगेश्वर घुमट आरती मंडळाला प्राप्त झाले. दुसरे बक्षिस श्री लईराई महिला घुमट आरती मंडळ, तिसरे युवा कला मोगी -तळावली फोंडा यांना बक्षिसे मिळाली. उत्तेजनार्थ बक्षिस श्री सातेरी महिला घुमट आरती मंडळ पोडवाळ खोर्जुवे यांना प्राप्त झाले.

वैयक्तिक बक्षिसांत उत्कृष्ट गायक म्हणून श्री लईराई महिला घुमट आरती मंडळ, उत्कृष्ट कसाळ वादक श्री सातेरी महिला घुूमट आऱती मंडळ, उत्कृष्ट समळ वादक युवा कला मोगी तळावली फोंडा, उत्कृष्ट घुमट वादन श्रीा शांतादुर्गा बोडगेश्वर घुमट आऱती मंडळ व उत्कृष्ट शिस्तबध्द पथक म्हणून श्री सातेरी महिला घुमट आऱती मंडळ पोडवाळ खोर्जुवे यांना पारितोषिके मिळाली.

Ghumat Competition
Madgaon News : वैद्यकीय कचरा खुल्या जागेत टाकण्याचा मडगावात प्रकार उघड

समाजसेविका निलीमा सूरज मोरजकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी पणजी सम्राट क्लबच्या अध्यक्षा प्रेरणा पावसकर, पांडुरंग वराडकर, रोहीदास नाईक, दत्ताराम नार्वेकर उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण सुशांत साळगावकर व सतीश कुडणेकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com