Murder Case: अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई नाही? तरुणाच्या खुनाने काणकोण हादरले; 300 ग्रामस्थांचा घेराव

Canacona Murder Case: माशे-लोलये येथे चिकन सेंटरमध्ये संजय नाईक (३८) याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केल्याच्या घटनेने काणकोण तालुका हादरला.
Canacona Murder Case
Murder CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: माशे-लोलये येथे चिकन सेंटरमध्ये संजय नाईक (३८) याचा धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केल्याच्या घटनेने काणकोण तालुका हादरला. संजयचा शेजारी एडवर्ड मोंतेरो याच्यावर या हत्येचा आरोप असून, त्याच्याविरोधात यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संशयितावर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका जमलेल्या ३०० ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर रात्री १०.१५ पोलिस संरक्षणात संशयित खुनी एडवर्ड याला पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये नेले.

दहा वेळा तक्रारी केल्या; तरी कारवाई नाही : ग्रामस्थ

संशयित एडवर्ड मोंतेरो याच्याविरोधात यापूर्वी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. किमान दहा वेळा तक्रारी करूनही पोलिसांनी अपेक्षित कारवाई केली नसल्याचा आरोप चिकन सेंटरचे मालक शेखर नाईक यांनी केला. संशयिताच्या कथित गैरवर्तनाबाबत आणि धमक्यांबाबत पोलिसांना सीसीटीव्ही चित्रणही दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संशयित ग्राहकांना शिवीगाळ करीत असल्याने त्याच्या घराच्या बाजूला लोखंडी पत्रे लावण्यात आली होती. मात्र, त्याने लोखंडी सळीने त्या पत्र्यांना छिद्रे पाडल्याचेही सांगण्यात आले.

Canacona Murder Case
Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

संशयिताकडून शस्त्रे वापरण्याच्या धमक्या मिळत असल्याचे व्हिडिओ आणि अन्य पुरावे पोलिसांना दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या तक्रारींची वेळीच दखल घेतली असती, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रत्येक वेळी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा सल्ला पोलिसांकडून दिला जात असल्याचेही शेखर नाईक यांनी सांगितले. या आरोपांबाबत पोलिसांची अधिकृत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे.

खुनाची माहिती मिळताच काणकोण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संशयितावर कारवाई करण्याची मागणी करीत संतप्त ग्रामस्थांनी मृतदेहाचा पंचनामा करण्यास आणि मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यास विरोध केला. सुमारे ३०० नागरिक घटनास्थळी जमल्याने तणाव वाढला. काही काळ नागरिकांनी जुन्या मडगाव-कारवार हमरस्त्यावर गर्दी केल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दक्षिण गोव्यातील विविध भागांतून पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता.

फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी

घटनेनंतर सुमारे पाच तासांनी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याने परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती कायम होती.

Canacona Murder Case
FC Goa vs Fortis FC: एफसी गोवाचा अखेर विजय! फॉर्टिस एफसीला 2-1 ने नमवत एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये गुणांचे खाते उघडले

माशे येथील घटना : चिकन सेंटरमध्ये रक्ताचा सडा

लोलये येथे बुधवारी दसरोत्सव सुरू असताना दुपारच्या वेळी माशे येथील चिकन सेंटरमध्ये कमी वर्दळ होती. संजय सेंटरमध्ये कामाला होता. तो एकटाच असताना एडवर्ड मोंतेरो सुरी आणि तलवार घेऊन तेथे आला. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर संशयिताने संजयवर धारदार शस्त्रांनी वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला संजय कोंबड्या ठेवलेल्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती समजताच परिसरात खळबळ उडाली. चिकन सेंटरचे मालक शेखर नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयचा विवाह ठरला होता. त्याच्या हत्येमुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com