Goa Bus Safety Rules: सार्वजनिक बससेवेसाठी आता सुरक्षा नियम कडक, खात्याकडून सूचना जारी; नियमांचे पालन न करण्यावर होणार कारवाई

Goa bus safety rules 2026: सार्वजनिक वाहतूक बस सेवेसाठी सुरक्षा नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
Goa Bus Safety Rules
Goa Bus Safety RulesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सार्वजनिक वाहतूक बस सेवेसाठी सुरक्षा नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत सर्व बसचालक व मालकांनी एआयएस–११९ या सुरक्षा मानकांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतूक खात्याने यासंदर्भात सार्वजनिक सूचना जारी केली आहे. ही कारवाई राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानंतर करण्यात आली आहे.

तसेच केंद्रीय सडक सुरक्षा संस्था यांनी सुचवलेल्या महत्त्वपूर्ण सुरक्षा शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.

Goa Bus Safety Rules
Goa Weather: गोव्यात निसर्गाचा 'डबल गेम'! दुपारी अंगाची लाहीलाही तर रात्री हुडहुडी; पाहा हवामान खात्याचा नवा इशारा

‘एआयएस–११९’ मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्लीपर कोच प्रकार–१ बससाठी अनिवार्य सुरक्षा व बांधकाम निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये आगप्रतिरोधक साहित्याचा वापर, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, वाहनाची संरचनात्मक मजबुती आणि स्लीपर बर्थची सुरक्षित रचना यावर विशेष भर देण्यात आला आहे.

दरम्यान, सूचनेनुसार आता नियमांची अंमलबजावणी ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असून, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही पावले उचलण्यात आली असून, यामुळे राज्यातील बस प्रवास अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Goa Bus Safety Rules
Goa Fire Accident: मध्यरात्री आगीचा तांडव! म्हावळींगेत दुकान जळून खाक, 'इतक्या' लाखांचं नुकसान; सुदैवानं मोठी जीवितहानी टळली

सुरक्षा उपाय अनिवार्य व अपरिवर्तनीय असतील :

चालक आणि प्रवाशांमध्ये असलेली विभाजन दरवाजे (ड्रायव्हर पार्टिशन डोअर्स) काढून टाकणे.

१२ मीटरपर्यंत लांबीच्या सर्व बसमध्ये आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग अनिवार्य करणे.

सर्व स्लीपर कोचमध्ये अग्निशमन ओळख व नियंत्रण प्रणाली पूर्णतः कार्यान्वित स्थितीत बसविणे.

स्लीपर कोचमध्ये संरचनात्मक मानकांचे काटेकोर पालन करणे;

स्लीपर बर्थसाठी स्लायडर व्यवस्था किंवा कोणतीही अनधिकृत चेसिस वाढविण्यास सक्त मनाई.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com