Canacona: "..अन्यथा तीव्र आंदोलन छेडू"! काणकोणमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, काँग्रेस नेते भंडारींची मागणी

Canacona farmers compensation: ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काणकोणसह संपूर्ण गोव्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते.
Heavy rain in goa
Heavy rain in goaDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद: काणकोणचे काँग्रेस नेते जनार्दन भंडारी यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जर जानेवारी २०२६ पूर्वी भरपाई मिळाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काणकोणसह संपूर्ण गोव्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना या संकटाचा फटका बसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Heavy rain in goa
National Farmers Day: गोवा मुक्तीच्या वेळी, जवळजवळ 70% लोकसंख्या पूर्णवेळ 'शेती'मध्ये गुंतलेली होती! परंपरा, निसर्ग आणि आधुनिकतेचा संगम

सरकारने प्रतिहेक्टर ४० हजार रुपये भरपाई जाहीर केली असली, तरी ती अपुरी असून अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, असे भंडारी यांनी नमूद केले. डिसेंबरपर्यंत मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कृषी संचालकांनी १५ जानेवारीपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन दिले असून ते त्वरित अमलात आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Heavy rain in goa
Khazan Farming: हजारो वर्षांपासूनचा वारसा! नद्यांच्या काठावरची 'खाजन शेती' ही गोव्याची ओळख..

कायमस्वरूपी धोरण बनवा!

कृषी कार्ड नसलेल्या; पण प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, तसेच भविष्यात आपत्तीवेळी तातडीची मदत मिळण्यासाठी कायमस्वरूपी धोरण तयार करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com