खून, घरफोड्या आणि अत्याचाराच्या घटनांमुळे काणकोणवासीयांमध्ये रोष, मूक आंदोलनातून सरकारचं वेधलं लक्ष; कठोर कारवाईची केली मागणी

Canacona Silent Protest: काणकोण परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांविरोधात नागरिकांनी शनिवारी चावडी येथील जुन्या बसस्थानकावर एकत्र येत शांततापूर्ण मूक आंदोलन केले.
Canacona Silent Protest
Canacona Silent ProtestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

चावडी: काणकोण परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांविरोधात नागरिकांनी शनिवारी चावडी येथील जुन्या बसस्थानकावर एकत्र येत शांततापूर्ण मूक आंदोलन केले. ‘आता आम्ही गप्प बसणार नाही!’ हा संदेश देत आयोजित केलेल्या या आंदोलनात सहभागी नागरिकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून वाढत्या गुन्हेगारीविषयी तीव्र चिंता व्यक्त केली.

महिला (Women) व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, खून, घरफोड्या, चोऱ्या तसेच अन्य गुन्हेगारी घटनांमुळे काणकोणच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, गुन्हेगारी कृत्यांवर कठोर कारवाई करावी आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार विजय पै खोत, काँग्रेसचे जना भंडारी आणि अमय पुराणिक यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सरकारने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

Canacona Silent Protest
Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मौन

तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून नागरिकांनी मौन पाळले असले, तरी त्यांच्या आंदोलनातून व्यक्त झालेला संदेश स्पष्ट होता. ‘आमचे मौन हेच आमचे आंदोलन आणि न्याय मिळणे हीच आमची मागणी!’ या घोषवाक्याद्वारे नागरिकांनी सुरक्षित काणकोणसाठी एकजुटीने आवाज उठवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.