Calangute Illegal Businesses: 'आम्हालाही मोकळा श्वास घेऊ द्या!' कळंगुटवासीयांचा संताप; बेकायदा व्यवसायांवर कारवाईचे पर्यटनमंत्र्यांचे आश्वासन

Rohan Khaunte Calangute Meeting: कळंगुट परिसरात सुरू असलेले दलालांचे प्रकार, दादागिरी, वेश्याव्यवसाय आणि बेकायदा मसाज पार्लर यांसारख्या व्यवसायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.
Rohan Khaunte Calangute Meeting
Calangute Illegal BusinessesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कळंगुट: कळंगुट परिसरात सुरू असलेले दलालांचे प्रकार, दादागिरी, वेश्याव्यवसाय आणि बेकायदा मसाज पार्लर यांसारख्या व्यवसायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. ‘आम्हालाही मोकळा श्वास घेऊ द्या,’ असे आग्रही आवाहन कळंगुटकरांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासमोर केले.

या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करून बेकायदा व्यवसाय बंद करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत कळंगुट पंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात स्थानिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी स्थानिक आमदार मायकल लोबो आणि सरपंच जोजफ सिक्वेरा व्यासपीठावर उपस्थित होते. कळंगुट हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र, परिसरातील काही बेकायदा व्यवहारांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

Rohan Khaunte Calangute Meeting
Goa Politics: पार्सेकरांची भाजपमध्ये लवकरच घरवापसी? उत्पल पर्रीकरही पुनर्प्रवेशाच्या विचारात; मांद्रे-पणजीच्या राजकीय समीकरणांची चर्चा

२०२२ पासून कळंगुटमधील बेकायदा व्यवहार बंद करण्याची मागणी आपण करीत आहोत. मात्र, स्थानिक पोलिस यंत्रणा या विषयावर गंभीर नसल्याने अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे, असे मंत्री खंवटे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी स्थानिक प्रश्नांवरून आमदार मायकल लोबो आणि सरपंच जोजफ सिक्वेरा यांना धारेवर धरले.

वेळप्रसंगी पोलिसांवर कारवाई : खंवटे

कळंगुट व परिसरातील बेकायदा व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घालणार असून, हे प्रकार कायमचे बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खंवटे यांनी दिले. अशा बेकायदा व्यवहारांना आळा घालण्यात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rohan Khaunte Calangute Meeting
Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Road Safety
Goa High Court Contempt Notice
Porvorim elevated road 600 crore project
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com