स्वातंत्र्य सैनिक शरदताई गुडे यांचे निधन

मडगावातील कित्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त शिक्षिका शरद विश्वनाथ गुडे (Sharadtai Gude) (86) यांचे काल मंगळवारी सकाळी निधन झाले.
Sharadtai Gude

Sharadtai Gude

Dainik Gomantak 

Published on: 
Updated on: 

मडगाव: गोवा मुक्ती चळवळीत (Goa Liberation Movement) मित्रा बिर यांच्या सहकारी म्हणून काम केलेल्या आणि मडगावातील कित्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त शिक्षिका शरद विश्वनाथ गुडे (86) यांचे काल मंगळवारी सकाळी निधन झाले. कालच त्यांच्यावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मडगावतील (Margao) प्रसिद्ध डॉक्टर विशाल गुडे आणि रवीश यांच्या मातोश्री होत.

शरदताई या नावाने त्या मडगावात परिचित होत्या. गोवा मुक्तीसाठी काम करणाऱ्या नेशनल काँग्रेस गोवाच्या त्या कार्यकर्त्या होत्या. अनेक स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी मदत केली होती. या मुक्ती संग्रामातील सेनानी असलेले विश्वनाथ गुडे यांच्याकडे नंतर त्यांचे लग्नही झाले.

<div class="paragraphs"><p>Sharadtai Gude</p></div>
कोकण रेल्‍वेचे ‍विद्युतीकरण मार्च महिन्‍यापर्यंत पूर्णत्वास

शिवाय, त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपले योगदान दिले असून गोव्यातील पहिली बालवाडी त्यांनी बाळ्ळी येथे सुरू केली होती. जिचे उद्घाटन देशाचे पाहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्या हस्ते झाले होते. नंतर त्यांनी मडगावच्या मॉडेल हायस्कूलात शिक्षादानही केले. मडगाव महिला मंडळाच्या त्या संस्थापक होत्या. कृषी क्षेत्रातही त्यांचा वावर होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com