गृहलक्ष्मी आधार योजनेला मडगावात महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

गृहलक्ष्मी आधार योजनेला (Grihalakshmi Aadhar Yojana) मडगावात महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 50 हजारापेक्षा जास्त महिलांनी स्वतःची नोंदणी केली आहे.
Trinamool Congress

Trinamool Congress

Dainik Gomantak 

Published on
Updated on

मडगाव: तृणमुल काँग्रेसने (Trinamool Congress) गोव्यात लागू करण्याची घोषणा केलेल्या गृहलक्ष्मी आधार योजनेला मडगावात महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 50 हजारापेक्षा जास्त महिलांनी स्वतःची नोंदणी केली आहे अशी माहिती तृणमुलच्या मडगावातील नेत्या व मडगावच्या (Margao) माजी नगराध्यक्ष डोरिस टेक्सेरा (Doris Texera) यांनी दिली. मडगावचे नगरसेवक घनश्याम शिरोडकर व महेश आमोणकर यांच्या बरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना टेक्सेरा यांनी ही माहिती दिली.

<div class="paragraphs"><p>Trinamool Congress</p></div>
फातोर्ड्यातील बंद केलेली कामे जर...:विजय सरदेसाईंचा इशारा

टेक्सेरा म्हणाल्या, गोव्यापेक्षा (Goa) पाचपट जास्त लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालात (West Bengal) ही योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून तिथे दरमहा महिलांना दीड हजार रुपये महिलांना दिले जात आहेत. गोव्याची लोकसंख्या कमी असल्याने गोव्यात दरमहा महिलांना 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असून या योजनेमुळे गोव्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

महेश आमोणकर यांनी महिलांच्या हातात पैसा आल्यास त्यांनी खरेदी केलेल्या खरेदीतून अर्थव्यवस्थाही बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तर घनश्याम शिरोडकर यांनी या योजनेचा फायदा सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Election 2027
Sewage Water In Colva Creek
Goa Assembly Election 2027 updates
Tiger Death In Goa 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com