Goa Politics: आधी लोकसंपर्क वाढवा, मंत्रिपद देणे नंतर बघू: सी. टी. रवी

सी. टी. रवींकडून नेत्यांना कानपिचक्या
C. T. Ravi's Guidance to Ministers and MLAs in goa
C. T. Ravi's Guidance to Ministers and MLAs in goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर गोवा प्रभारी सी.टी. रवी गुरुवारी गोव्यात दाखल झाले. शुक्रवारी दिवसभर त्यांच्या बैठकांची सत्रे सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांना त्यांनी ‘लोकसंपर्क वाढवा, लोकांमध्ये मिसळा आणि राज्य व केंद्र सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा, मंत्रिपदाचे नंतर बघू’ अशा कानपिचक्या दिल्याचे समजते.

(C. T. Ravi's Guidance to Ministers and MLAs in goa)

C. T. Ravi's Guidance to Ministers and MLAs in goa
Goa Mining Case: रक्कम वसुलीची याचिका गोवा फाऊंडेशनकडून मागे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर गोवा प्रभारी सी. टी. रवी गुरुवारी उशिरा गोव्यात दाखल झाले. त्यांच्या या गोवा दौऱ्यामुळे विविध प्रकारच्या चर्चेला ऊत आला होता. आज दिवसभर त्यांच्या बैठकांची सत्रे सुरू होती.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने भाजपात दाखल झालेल्या आमदारांना त्यांनी लोकसंपर्क वाढवा, लोकांमध्ये मिसळा आणि राज्य व केंद्र सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा, मंत्रिपदाचे नंतर बघू अशा कानपिचक्या दिल्याची माहिती आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सचिव तथा गोव्याचे प्रभारी सी. टी. रवी यांनी आज पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री, आमदार आणि विविध विभागाच्या प्रमुख नेत्यांशी वेगवेगळ्या बैठका घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर, दामू नाईक, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आरती बांदोडकर उपस्थित होत्या.

C. T. Ravi's Guidance to Ministers and MLAs in goa
Colvale Jail: कोलवाळ कारागृहात तुरुंगाधिकारी वेंगुर्लेकरांवर दुसरा हल्ला

या बैठकांमध्ये पक्षाच्या कामांचा तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला. देशातील सार्वत्रिक निवडणुकांचे वारे हळुहळू वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेवा पंधरावडा’ आणि बूथ सशक्तीकरण’ हे उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांतर्गत राज्यात केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. आमदार आणि मंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मात्र, या बैठकीमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांच्या मंत्रिपदावर चर्चा झाली नाही. मात्र, खासगीमध्ये त्यांनी याबाबत विचारणा केली असता लोकसंपर्क वाढवा, पदाचे नंतर बघू असे सांगितले आहे.

सी. टी. रवी यांचे मंत्री, आमदारांना मार्गदर्शन

रवी यांनी आगामी काळात करावयाची कामे आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आमदार आणि मंत्र्यांना विविध सूचना केल्या. या बैठकांना मंत्री माविन गुदिन्हो, विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, गोविंद गावडे, रवी नाईक, निळकंठ हळर्णकर, सुभाष शिरोडकर, नीलेश काब्राल उपस्थित होते. तसेच आमदारांसोबत झालेल्या बैठकीस आमदार प्रवीण आर्लेकर, ज्योशुआ डिसोझा, दिलायला लोबो, मायकल लोबो, केदार नाईक, जेनिफर मोन्सेरात, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, प्रेमेंद्र शेट, देविया राणे, संकल्प आमोणकर, दाजी साळकर, आलेक्स सिक्वेरा, दिगंबर कामत, उल्हास तुयेकर, गणेश गावकर आणि रमेश तवडकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com