Diwali Goa Trip: 10 हजारांच्या बजेटमध्ये गोवा दर्शन! दिवाळीत 'नरकासूर दहन' आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद 3 रात्री/ 4 दिवसांत घ्या, अशी करा ट्रिप प्लॅन

Goa Diwali Trip Budget: देशात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण गोव्याच्या दिवाळीची मजा काही औरच आहे. गोव्याला दिवाळीच्या काळात भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
Goa Diwali Trip Budget
Diwali Goa Trip
Published on
Updated on

पणजी: देशात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण गोव्याच्या दिवाळीची मजा काही औरच आहे. गोव्याला दिवाळीच्या काळात भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. अनेक पर्यटकांना गोव्यातील नरकासुर दहनाचा उत्साह आणि शांत समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घ्यायचा असतो, पण जास्त बजेटमुळे अनेकजण मागे हटतात. मात्र, योग्य नियोजन आणि स्मार्ट निवडी करुन तुम्ही 10,000 ते 20,000 च्या बजेटमध्येही गोव्यात 3 रात्री/4 दिवसांची ट्रिप यशस्वीपणे एन्जॉय करु शकता.

बजेट-फ्रेंडली राहण्याची सोय

गोव्यातील (Goa) प्रवासाचा सर्वात मोठा खर्च राहण्यावर होतो. दिवाळीच्या हंगामात दर वाढलेले असतात, पण तुम्ही स्मार्ट पर्याय निवडू शकता.

  • बजेट हॉटेल्स आणि होमस्टे: गोव्यात बजेट फ्रेंडली हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस किंवा होमस्टे उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही राहू शकता.

  • हॉस्टेल्सचा पर्याय: जर तुम्ही एकटे किंवा मित्रांसोबत प्रवास करत असाल, तर डॉर्मिटरी (Dormitory) असलेल्या हॉस्टेल्सचा पर्याय सर्वात स्वस्त ठरु शकतो.

Goa Diwali Trip Budget
Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

फिरण्यासाठी स्मार्ट पर्याय

गोव्यात फिरण्यासाठी कॅब आणि टॅक्सी खूप महाग पडू शकतात. बजेटमध्ये फिरण्यासाठी खालील पर्याय वापर करु शकता.

  • स्कूटर/बाईक भाड्याने घ्या: गोव्यात स्थानिक वाहतुकीसाठी हा सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर मार्ग आहे. स्कूटर किंवा बाईक दररोज 300 ते 400 मध्ये भाड्याने मिळते. यामुळे टॅक्सीच्या तुलनेत दररोज 150 किंवा त्याहून अधिक बचत होऊ शकते.

  • बचत: वेळेची आणि इंधनाची बचत करण्यासाठी Google Maps वापरुन तुम्ही भेट देणार असलेल्या ठिकाणांसाठी योग्य मार्गांचा प्लॅन आधीच करा.

Goa Diwali Trip Budget
Goa Trip Scam: सोशल मीडियावर मैत्री झाली, गोव्याला फिरायला बोलावलं, व्हिडिओ बनवून केलं ब्लॅकमेल; अहमदाबादच्या वकिलाला 20 लाखांना गंडा

फिरण्याची ठिकाणे आणि सांस्कृतिक अनुभव (3 रात्री/4 दिवसांचे नियोजन)

तुमचा प्रवास उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन भागांमध्ये विभागून तुम्ही कमी वेळेत जास्त ठिकाणे पाहू शकता.

  • दिवस 1 आणि 2 (उत्तर गोवा): पणजी आणि आसपासच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करा. कळंगुट, बागा, आणि हणजूण बीच यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्या. विशेष म्हणजे, दिवाळाच्या काळात तुम्हाला संपूर्ण गोव्यात नरकासुर दहनाचा आणि दिवाळीच्या रोषणाईचा उत्साह अनुभवयाला मिळतो.

  • दिवस 3 (दक्षिण गोवा): शांत आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी दक्षिण गोवा राखून ठेवा. दक्षिण गोव्यात शांत समुदकिनारी फिरण्याची मजाच काही और आहे.

Goa Diwali Trip Budget
Goa Monsoon Trip: तुमच्या आवडत्या व्यक्तीसह गोव्याला पावसाळ्यात भेट द्या! गर्दी नाही, खर्च कमी, निसर्गाचा मनसोक्त अनुभव मिळवा

स्थानिक रेस्टॉरंट्स: गोव्यात तुम्हाला अस्सल गोवन खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळते. तुम्ही साध्या आणि चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. येथे तुम्ही परवडाणाऱ्या दरात पोटभर आणि चविष्ट भोजन करु शकता.

फूड स्टॉल्स: तसेच, तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर स्वस्त फूड स्टॉल्सवर स्नॅक्स आणि स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

Goa Diwali Trip Budget
Goa Trip: गोव्याला फिरायला जाताय? 'या' गोष्टी खरेदी करायला विसरू नका

लवकर बुकिंग करा: दिवाळीच्या काळात विमानाचे तिकीट आणि हॉटेल्सचे बुकिंग लवकर केल्यास तुम्हाला चांगली 'डील्स' मिळतील आणि खर्च कमी होईल.

दिवाळीच्या काळात गोव्यात गर्दी जास्त असते. त्यामुळे तुमच्या प्रवासाच्या वेळेनुसार नियोजन केल्यास अधिक फायदा होऊ शकता. या स्मार्ट नियोजनामुळे तुम्ही 20,000 च्या बजेटमध्येही गोव्यातील दिवाळीचा सांस्कृतिक उत्साह आणि समुद्रकिनाऱ्यावरील मजा दोन्हीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com