Goa: भारतीय संविधान आणि बायबल दोन्ही ख्रिस्ती लोकांसाठी जीवनाचा आधार; चर्च बुलेटीन

Goa And Daman Church Bulletin: प्रत्येक नागरिकाला संविधानाची माहिती असणे आवश्यक असल्याचे या लेखात म्हटले आहे.
Goa: भारतीय संविधान आणि बायबल दोन्ही भारतीय ख्रिस्ती लोकांसाठी जीवनाचा आधार; चर्च बुलेटीन
Indian Tricolor, Constitution And BibleDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय संविधान आणि बायबल दोन्ही भारतीय ख्रिस्ती लोकांसाठी जीवनाचा आधार आहेत, असे मत गोवा आणि दमण येथून प्रसिद्ध होणाऱ्या चर्च बुलेटीनमध्ये मांडण्यात आले आहे. रेनोवाकाव या बुलेटीनमध्ये 'बिईंग अ‍ॅन इंडियन ख्रिश्चन' या लेखातून विचार मांडण्यात आले आहेत.

भारतीय संविधानाकडे दुर्लक्ष केल्याने दुरगामी परिणाम निर्माण होऊ शकतात, असे या चर्च बुलेटीनमध्ये म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या या लेखात भारतीय संविधान आणि बायबलचा फोटो देण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाला संविधानाची माहिती असणे आवश्यक असल्याचे या लेखात म्हटले आहे. किमान संविधानाची प्रस्तावना तरी माहिती आसावी असे लेखात नमूद करण्यात आले आहे.

Goa: भारतीय संविधान आणि बायबल दोन्ही भारतीय ख्रिस्ती लोकांसाठी जीवनाचा आधार; चर्च बुलेटीन
Goa Crime: ऑनलाइन जुगारात झाला कंगाल; ओडिशाच्या तरुणाने गोव्यात संपवले जीवन

संविधानाची किमान माहिती आणि ज्ञान तरी असावे. यातील अधिकारांकडे दुर्लक्ष केल्यास आपण राजकीय नेते, वकीलांचे गुलाम होऊ, असे या लेखात म्हटले आहे. भारतीय संविधान आणि बायबल दोन्ही वेगवेगळे असले तरी भारतीय ख्रिस्ती नागरिकांसाठी हे दोन्ही ग्रंथ महत्वाचे आहेत, असे या लेखात लिहले आहे.

Goa: भारतीय संविधान आणि बायबल दोन्ही भारतीय ख्रिस्ती लोकांसाठी जीवनाचा आधार; चर्च बुलेटीन
Sattari Drowning Case: पोहण्यासाठी गेलेल्या राजस्थानच्या पर्यटकाचा सत्तरी येथे नदीत बुडून मृत्यू

कोणाचाही जन्म पहिल्यांदा एक मानवी देह म्हणून होतो. त्यानंतर त्याची नोंद पंचायत किंवा पालिकेत केली जाते. भारतीय म्हणून नोंद झाल्यानंतरच त्याचा कोणत्याही धर्मात प्रवेश होत असतो, असे या लेखात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com