Borim: बोरी साईबाबा देवालय नेमके कुणाचे?वाद मिटायला तयार नाही, दोन्ही गट अजूनही आपापल्या भूमिकेवर ठाम

Borim Sai Baba Temple Dispute: बोरीतील साईबाबा मंदिराचा वाद चिघळत चालला असून, दोन गट आपापल्या मतांवर ठाम असल्याने हा वाद मिटेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
Borim Sai Baba Temple Dispute
BorimDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: बोरीतील साईबाबा मंदिराचा वाद चिघळत चालला असून, दोन गट आपापल्या मतांवर ठाम असल्याने हा वाद मिटेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तरी हा प्रश्‍‍न ‘जैसे थे’ आहे. साईबाबा सेवा मंडळ ट्रस्ट आणि ग्रामस्थ, असा हा वाद असून शेवटी न्यायालयाचा हस्तक्षेपच याविषयावर तोडगा ठरू शकतो, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

बोरीतील तीन वाड्यांवरील ग्रामस्थांनी साईबाबा मंदिर व्यवस्थापनवर दावा केल्यामुळे गेली तीन वर्षे चाललेल्या देवस्थान व्यवस्थापनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुळात साईबाबा देवालय कुणाचे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टने हा विषय न्यायालयात सोडला आहे.

Borim Sai Baba Temple Dispute
Mhadei Dispute: "म्हादई प्रवाह प्राधिकरण कर्नाटकच्याच बाजूने!" निर्मला सावंत यांचा थेट आरोप; 'कळसा-भांडुरा'ची प्रत्यक्ष पाहणी करण्याची आग्रही मागणी

मागच्या वेळेला न्यायालयाने सेवा मंडळ ट्रस्टच्या बाजूने निकाल दिल्याने त्या निवाड्याला आव्हान देणे कठीण असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे आमची न्याय्य बाजू असल्याचे सेवा मंडळ ट्रस्टचे म्हणणे आहे.

दुसऱ्या बाजूला बोरीतील तिन्ही वाड्यांवरील ग्रामस्थ एकत्रित झाले आहेत. विद्यमान ट्रस्टसंबंधी भाविकांच्या अनेक तक्रारी आल्यामुळे ट्रस्टचे व्यवस्थापन ठीक नाही, असा दावा करून या ग्रामस्थांनी आता मंदिराचा ताबा घेतला आहे. सध्या मंदिर व्यवस्थापनावर दावा करणारे दोन्ही गट आपापल्या मतांशी ठाम असल्याने हे प्रकरण मिटेल की चिघळेल, असा सवाल आहे.

Borim Sai Baba Temple Dispute
Mirabag Savarde: 'अन्यथा आमची दैवते अन गावे पाण्याखाली जातील'! मीराबाग-सावर्डेत बंधाऱ्याविरुद्ध आंदोलन; राखणदाराला घातले गाऱ्हाणे

एकत्रित बैठक गरजेची!

पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून दोन्ही गटांची एकत्रित बैठक बोलावली तर कदाचित प्रश्न सुटू शकेल, असाही दावा काही साईभक्तांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com