Govind Gawade
Govind GawadeDainik Gomantak

Govind Gaude : गोव्याला ‘आऊटस्टेशन’ खेळाडूंचा ‘बूस्टर’ शक्य; क्रीडामंत्र्यांचा अप्रत्यक्ष दुजोरा

राष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्वोत्तम यजमान संघ निवडण्यावर भर

गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी आणि उठावदार कामगिरीसाठी राज्य संघात बाहेरगावचे क्रीडापटू दिसू शकतील. विविध खेळांच्या संघांना ‘आऊटस्टेशन’ खेळाडूंचा ‘बूस्टर’ देण्याबाबत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी मंगळवारी अप्रत्यक्ष दुजोरा दिला.

बाहेरगावचे खेळाडू निवडण्याच्या प्रश्नावर क्रीडामंत्री गावडे यांनी स्पष्ट नकार दिला नाही. ते म्हणाले, निवड संबंधित बाब सर्व क्रीडा संघटनांवर अवलंबून आहे. सर्व क्रीडा संघटनांची घटना आहे. त्याची पायमल्ली होणार नाही, हे मी पाहीन.

संघ निवडीसंदर्भात आम्ही त्यांना निर्देश दिले आहेत. संघ पूर्णतः संबंधित क्रीडा संघटनाच निवडणार नाही. गोवा क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे प्रशिक्षक, अधिकारी निवड प्रक्रियेचा भाग असतील. स्पर्धेत गोव्याचे सर्वोत्तम संघ खेळतील, हेच आमचे उद्दिष्ट असेल.

Govind Gawade
कांदोळीच्या पर्यटन माहिती केंद्रात 'नमस्ते चाय काउंटर'; कोण भागीदार, कोणाला मिळतोय नफा? परबांचा सवाल

गतवर्षी दिला होता ‘ओन्ली गोवन्स’चा नारा

राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडताना काही क्रीडा संघटना त्यांच्या घटनेनुसार संघात गोव्यात निवासी असलेले दुसऱ्या राज्यातील खेळाडू निवडू शकतात. मात्र, गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘ओन्ली गोवन्स’चा नारा देण्यात आला होता.

गोवा निवासी दाखला नसल्यामुळे कॅनोईंग-कयाकिंग आणि तलवारबाजी संघातील खेळाडूंची नावे वगळली होती. तेव्हा गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या (जीओए) मान्यतेने संघ पाठविले होते.

गोव्याची गतवर्षीची कामगिरी

05 ब्राँझ

32 पदक विजेत्या संघांत 30 वा क्रमांक

13 क्रीडा प्रकारांत सहभाग

Govind Gawade
Holi 2023: रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेल्या दोघांना जलसमाधी

2022 मधील ब्राँझपदक विजेते

अभिजीत निंबाळकर : पुरुष ट्रॅम्पोलाईन जिम्नॅस्टिक

श्रुंगी बांदेकर : महिला जलतरण २०० मीटर मेडली

रामा धावसकर, ॲरोन परेरा : पुरुष बीच व्हॉलिबॉल

युतिका सतरकर : महिला मल्लखांब (रोप)

पुष्पेंद्र राठी : पुरुष बॉक्सिंग मिडलवेट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com