Jetty Project Goa: जेटीचे काम थांबवा, अन्यथा पणजीत मोर्चा; ग्रामस्थांचा इशारा; असोल्डा, शेळवण, होडर येथील प्रकल्पाला विरोध

Assolda Shelvan Hodar project opposition: असोल्डा, शेळवण आणि होडर येथील प्रस्तावित जेट्टी, रोड ओव्हर ब्रिज, लोडिंग आणि अनलोडिंग प्रकल्पाचे काम थांबवण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.
Jetty Project Goa
Jetty Project GoaDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: असोल्डा, शेळवण आणि होडर येथील प्रस्तावित जेट्टी, रोड ओव्हर ब्रिज, लोडिंग आणि अनलोडिंग प्रकल्पाचे काम थांबवण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. अन्यथा पणजीत मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

शेळवण येथे रविवारी ग्रामस्थांनी बैठक झाली. यावेळी स्थानिक पंच मनोज नाईक यांनी प्रस्तावित जेटी कोणत्याही परिस्थितीत शेळवण व होडर येथे होऊ देणार नसल्याचे सांगितले.

याविषयी राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी झाली असून लवादाने कोणताही निर्णय घेताना अथवा जागेची पाहणी करताना अर्जदार तसेच पंचायत मंडळाला सूचित करावे असे आपल्या आदेशात म्हटले असले तरी सरकारने या आदेशाचे पालन केले नाही, असे नाईक यांनी सांगितले.

Jetty Project Goa
Goa Employee Marital Data: 12,907 कर्मचारी 'शुभमंगल' विना; नियोजन, सांख्‍यिकी मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातून समोर

दिनार तारकर यांच्या कंपनीमार्फत प्रस्तावित जेटीचे काम करण्यात येणार आहे. मात्र कोणत्याही पारिस्थितीत हे काम स्थानिक लोक होऊ देणार नाहीत, असे माजी पंच सुशांत नाईक यांनी सांगितले.

लोकांचा विरोध पाहता सध्या शेळवण येथील जेटीचे काम तात्पुरते थांबविण्यात आले असल्याचे तारकर कंपनीतर्फे सांगितले असले तरी आम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण आम्हाला हे काम तात्पुरते नव्हे तर पूर्णपणे बंद झालेले हवे आहे, असे त्यांनी सांगितले. या जेटीचा वापर फक्त कोळसा हाताळणीसाठी होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येते असे त्यांनी सांगितले.

Jetty Project Goa
Goa Temples: ‘कोकणाख्याना’त गोव्याचे निर्माण परशुरामाने बाण मारून केल्याचा उल्लेख होतो; धर्मस्थानांच्या दंतकथा

शेळवण येथे यापूर्वीही असे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न झाला होता, पण लोकांनी हा प्रयत्न हाणून पडला होता, असे दत्तराज गावस देसाई यांनी सांगितले. जेटीचे काम बंद न केल्यास सर्व ग्रामस्थ पणजीत मोर्चा नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत हा प्रकल्प गावातून हद्दपार होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी आंदोलन तीव्र केले जाईल, असे देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com