Bodybuilding Competition : तब्बल पंधरा वर्षांनी डिचोलीत आज शरीरसौष्ठव स्पर्धा

विजेत्याला रोख 20 हजार रुपयांसह ‘मिस्टर बिचोलीम’ हा किताब बहाल करण्यात येणार आहे.
Bodybuilding competition
Bodybuilding competitionGomantak Digital Team
Published on
Updated on

Bodybuilding Competition : तब्बल पंधरा वर्षांच्या कालखंडानंतर डिचोलीत यंदा पुरुषांसाठी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी (ता.25) सायंकाळी 6 वा. येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत चॅम्पियन ठरणाऱ्या विजेत्याला रोख 20 हजार रुपयांसह ‘मिस्टर बिचोलीम’ हा किताब बहाल करण्यात येणार आहे.

पी. पी. धोंड गो मस्कलर जीम अँड फिटनेस सेंटर आणि आर फिटनेस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यास आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये प्रमुख पाहुणे तर नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि फोगेरी केटरर्सचे कुंदन फोगेरी खास अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Bodybuilding competition
Singing Competition: राज्ञी फळदेसाई वास्को अभंग स्पर्धेत अव्वल

गुरुवारी सायंकाळी नगरपालिका सभागृहात स्पर्धेतील चषकांचे अनावरण केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पी. पी. धोंड गो मस्कलर जीम अँड फिटनेस सेंटरचे प्रसाद धोंड यांनी ही माहिती दिली. यावेळी आर फिटनेस स्टुडिओचे हसन शेख, आयोजन समितीचे विष्णू उसकईकर, प्रथम आमोणकर, अरुण नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Bodybuilding competition
Gomantak Quiz Competition : गोमन्तक प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील दोन बंपर विजेत्यांना लॅपटॉपचे वितरण

राज्य पातळीवरील स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना चषक आणि रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्य पातळीवरील स्पर्धेसह डिचोली आणि मये भागातील युवा शरीरसौष्ठवपटू आणि फिटनेस ॲथिलीटना पुढे येण्यासाठी वेगळ्या गटातून स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती विष्णू उसकईकर यांनी दिली. जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धेचा आस्वाद घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com