Singing Competition: राज्ञी फळदेसाई वास्को अभंग स्पर्धेत अव्वल

मुरगाव पातळीवरील स्पर्धा : स्वप्नील गावकर ठरला उपविजेता
Singing Competition
Singing CompetitionDainik Gomantak

स्व. जे. के. पवार स्मरणार्थ सुरभी संगीत विद्यालय व श्री विठ्ठल रखुमाई संस्थान शांतीनगर, वास्को यांनी आयोजित केलेल्या 16 व्या मुरगांव मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे विजेतेपद राज्ञी फळदेसाई नवेवाडे हिला प्राप्त झाले.

तिला रोख रक्कम, फिरता चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. दुसरे बक्षीस नवेवाडे येथील स्वप्नील गावकरने तर तिसरे बक्षीस सडा येथील दक्षा परब हिने प्राप्त केले.

स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस हेडलॅन्ड सडा येथील संतोष मोरुडकरने दुसरे उत्तेजनार्थ दाबोळी येथील साईश शिंदेने तर तिसरे मेस्तावाडा येथील श्रेया तुयेकर हिने मिळवले. खास उत्तेजनार्थ बक्षीस भास्कर डी. नाईक यांना प्रदान करण्यात आले.

तसेच विशेष पुरस्कार संस्थेची विद्यार्थिनी सिद्धी कालिदास होळकर हिला रोख रुपये व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत 22 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

लहान गटातील पहिले पारितोषिक साईराज गावडे व दुसरे पारितोषिक रेवा रायकर हिस प्राप्त झाले या गटात फक्त दोन स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण संगीत शिक्षक देवानंद भोसले यांनी केले.

Singing Competition
Goa Shigmotasv: दुर्भाटच्या चित्ररथाची बाजी

बक्षीस वितरणप्रसंगी उपमुख्याध्यापिका राजश्री जाधव, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, रामचंद्र पटेकर, रत्नाकर कांबळी, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, सर्वेश सातार्डेकर, यज्ञेश सातार्डेकर, हरीश्चंद्र नाईक, केतन खोर्जुवेकर हे सुरभी संगीत विद्यालयाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालक केशव काळे यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com