Rajesh Phaldesai: गोवा डेअरीला लालफितीतून बाहेर पडण्यासाठी मदतीची गरज

दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई मागणार राज्य सरकारकडे मदत
Goa Dairy
Goa DairyDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याला दुधाचा पुरवठा आवश्यकतेप्रमाणे होण्यासाठी राज्यात गोवा डेअरीची स्थापना झाली. मात्र संपुर्ण गोव्याला आवश्यक असणारा दुधाचा पुरवठा होऊ शकलेला नाही. अशा वेळी गोवा डेअरी दूध उत्पादक संघाला लाल फितीच्या कारभाराने चर्चेत आणले. यावर आता गोवा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी आपले मत नोंदवले आहे. गोवा डेअरीची वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडली यावेळी ते बोलत होते.

(Goa Dairy loss is to the tune of Rs 15 crore says Chairman Rajesh Phaldesai to seeked goa govt help)

Goa Dairy
शिक्षण संस्थांनी सुजाण नागरिक घडवावेत : राजू नायक

याबाबत बोलताना फळदेसाई म्हणाले की. गोवा डेअरीला 15 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामूळे या लालफितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारची मदत घेणे आवश्यक आहे. आज 21 ऑगस्ट रोजा गोवा डेअरीच्या 2019 - 2022 या आर्थिक वर्षातील कारभाराबाबत फळदेसाई यांनी भाष्य केले आहे.

Goa Dairy
Goa Crime Branch : 15 लाख किमतीच्या 'एमडीएमए' सोबत नायजेरियन महिला ताब्यात

फळदेसाई म्हणाले की, गोवा डेअरीला 14 ते 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, दुग्धशाळेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारला आर्थिक मदतीची विनंती करणार आहे. कारण सध्याची स्थिती पाहता संघाला मदतीची नितांत गरज आहे. कारण संघावर असणाऱ्या कर्जाचा बोजा हा मदतीखेरीज कमी होणार नाही असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारकडे मदत मागणार असल्याचे सांगताना फळदेसाई यांनी गोवा संघावर ही वेळ का ? आली हे ही सांगितले. ते म्हणाले की, गोवा संघावर प्रशासक नेमला गेला आणि संघाची परिस्थिती याच कालावधीत अधिक बिघडत गेली यावेळी योग्य त्या पद्धतीने संस्थेचा कारभार होणे आवश्यक होता. मात्र तो झाला नसल्याने ही वेळ आली असल्याचं ही ते म्हणाले.

लेखापरीक्षकांमार्फत डेअरीच्या आर्थिक लेखापरीक्षणाची दूध उत्पादकांची मागणी

गोवा डेअरीची स्थापना झाली ता संपुर्ण गोव्याला आवश्यक असणारा दुधाचा पुरवठा व्हावा यासाठी मात्र आज पर्यंत संपूर्ण राज्याला फक्त गोवा डेरीने पुरवठी केला असे कधीच झालेले नाही. उलट लालफितीच्या कारभाराने ही संस्था अर्थिक कारणाने अधिक अधिक खोल गर्तेत अडकते आहे.

त्यामूळे आम्ही दूध उत्पादक म्हणून या संस्थेचे भविष्य अधिक चांगले असावे यासाठी एजीएम नेमलेल्या लेखापरीक्षकांमार्फत डेअरीच्या आर्थिक लेखापरीक्षणाची मागणी केली आहे. असे ही काही दूध उत्पादकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com