भाजप दक्षिण गोवा प्रभारी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात ते दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांशी संवाद साधत असल्याची माहिती समोर आली आहे.
( BJP’s South Goa in-charge Rajeev Chandrasekhar on two-day visit for LS poll prep)
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री आणि भाजपचे दक्षिण गोवा प्रभारी राजीव चंद्रशेखर हे दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. 29 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी दक्षिण गोव्यातील केपे, फातर्पा, येथे भेट देत कार्यकत्यांशी संवाद साधला आहे.
या दौऱ्यात त्यांनी विजयासाठी काय करता येईल यावर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह, भाजपचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रशेखर हे 30 नोव्हेंबर 2022 रोजी मडगाव येथील जिल्हा कार्यालयाला भेट देऊन मडगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष व नगरसेवक, सरपंच, उपसरपंच व दक्षिण गोव्यातील निवडून आलेले लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहेत.
यावेळी ते लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे इतर पक्षांच्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली मंद असल्या तरी भाजपने मात्र आपल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.