Goa Zilla Panchayat Election Results: सत्तरीत राणेच किंग! तिन्ही जागांवर फुलले 'कमळ'; विश्वजित, देविया राणेंना अश्रु अनावर

Vishwajit Rane & Deviya Rane Emotional: गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना पराभवाची धूळ चारली.
Vishwajit Rane & Deviya Rane Emotional
Vishwajit Rane & Deviya Rane EmotionalDainik Gomantak
Published on
Updated on

सत्तरी: गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना पराभवाची धूळ चारली. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सत्तरीतील तिन्ही जिल्हा पंचायत जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवून आपला बालेकिल्ला अबाधित राखला. नगरगाव, केरी आणि होंडा या तिन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने मुसंडी मारली. या अभूतपूर्व यशानंतर राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांना आनंदाश्रू अनावर झाले.

विक्रमी मताधिक्याने विरोधक चितपट

सत्तरीतील (Sattri) नगरगाव, केरी आणि होंडा या तिन्ही जागांच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती, जी शेवटपर्यंत कायम राहिली.

  • नगरगाव: येथे भाजपचे उमेदवार प्रेमनाथ दळवी यांनी 10175 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला.

  • केरी: या मतदारसंघात भाजपचे निलेश परवार यांनी सर्वाधिक 13264 मतांचे मताधिक्य घेत विरोधकांना नामोहरम केले.

  • होंडा: भाजपचे नामदेव च्यारी यांनी 9816 मतांनी विजयी होत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Vishwajit Rane & Deviya Rane Emotional
Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

हा जनतेचा विजय - विश्वजित राणे

प्रचंड जनादेश मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे कमालीचे भावूक झाले. राणे म्हणाले की, "हा निकाल माझा वैयक्तिक विजय नाही, तर हा सत्तरीतील जनतेचा विजय आहे. जनतेने आमच्या कुटुंबावर आणि भाजपच्या विकासकामांवर जो अढळ विश्वास दाखवला, त्यापुढे मी नतमस्तक आहे." सत्तरीच्या या विजयासाठी विश्वजित राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी ताकद पणाला लावली होती, ज्याचे फळ आज निकालाच्या रुपाने मिळाले आहे.

Vishwajit Rane & Deviya Rane Emotional
Goa Zilla Panchayat Election: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत 80% नव्‍या चेहऱ्यांना संधी! दामू नाईक यांची माहिती; Watch Video

आमदार देविया राणे यांना अश्रू अनावर

त्याचवेळी, विजयाचा जल्लोष साजरा होत असताना पर्येच्या विद्यमान आमदार डॉ. देविया राणे यांनाही भावना अनावर झाल्या. कार्यकर्त्यांच्या अफाट मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. "सत्तरीच्या मतदारांनी नेहमीच आम्हाला साथ दिली आहे. हा विजय आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे," असे सांगत त्यांनी भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि तमाम मतदारांचे मनापासून आभार मानले.

Vishwajit Rane & Deviya Rane Emotional
Zilla Panchayat Election: 'मागच्या दरवाजानं काँग्रेसमध्‍ये कुणालाही प्रवेश दिला नाही', जिल्हाध्यक्षांनी स्पष्टचं सांगितलं; सासष्टीतील पाचही जागांसाठी अर्ज दाखल

दुसरीकडे, मतदान पार पडल्यानंतर गोव्यातील (Goa) राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आज (22 डिसेंबर) लागलेल्या निकालांनी हे स्पष्ट केले की, सत्तरीच्या जनतेने विकासाच्या राजकारणालाच कौल दिला आहे. या विजयामुळे भाजपची राज्यातील पकड अधिक घट्ट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com