Sanquelim Municipal Council Election 2023 : मतदारांना मतांसाठी घराबाहेर काढण्यात भाजपला यश !

दबावाच्या वातावरणाची जाणीव; 31 उमेदवारांचे भविष्य पेटीबंद
Sankhlim Municipality Election 2023
Sankhlim Municipality Election 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim Municipal Council Election 2023 : साखळी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी काही अपवादात्मक प्रकार वगळता एकप्रकारच्या दबावात्मक वातावरणात मतदान झाले. या निवडणुकीत भाजप मतदारांना मतांसाठी बाहेर काढू शकल्याने वाढीव मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे रविवारी कळणार आहे.

साखळी नगरपालिकेत बारा जागांसाठी आज मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. सुरवातीला अत्यंत कमी प्रमाणात मतदार मतदान केंद्राकडे जाताना दिसत होते.

Sankhlim Municipality Election 2023
Sanquelim Municipal Council Election 2023 : बाचाबाची...शिवीगाळ... हमरीतुमरी आणि समेटही; साखळी @ 87.56

परंतु हळूहळू हा टक्का वाढत गेला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गतवर्षी साखळीमध्ये ८५.०५ एवढे टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र ८७.७६ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेली अडीच टक्के मतांची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार आहे, हे निकालानंतरच सांगता येईल.

भाजप पुरस्कृत आणि सर्वपक्षीय ‘टुगेदर फॉर साखळी‘ अशा दोन गटांमध्येच खरी लढत होती, असे मानले जात होते. बारा जागांपैकी दोन उमेदवार बिनविरोध आल्याने उर्वरित दहा जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात होते. म्हणजेच अकरा अपक्ष उमेदवार उभे होते.

Sankhlim Municipality Election 2023
Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर अनर्थ टळला! प्रवाशाने केला विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न

साखळी पालिकेची निवडणूक जशी जाहीर झाली, तशी ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची बनली. विधानसभेला साखळी शहराने मुख्यमंत्र्यांना पीछाडावर ढकलेले होते, त्यांना हात दिला तो ग्रामीण भागाने. त्यामुळे शहरातील मते भाजपच्या बाजूने नाहीत, असे स्पष्ट झाले होते.

यावेळी काहीही करून भाजपने नगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायचीच, असा चंग बांधला होता. त्यानुसार जरी उघडपणे कोणी सांगत नसले तरी सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने सर्व नीतींचा वापर केला आहे.

भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

सकाळपासून तुरळक प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. परंतु उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतांची टक्केवारी वाढत गेली. काही झाले तरी भाजपने यावर्षी ही निवडणूक बरीच प्रतिष्ठेची बनविली.

काँग्रेसच्या गोटात असलेल्या यशवंत माडकर, रियाज खान यांच्यासारखे उमेदवार भाजपने आपल्या बाजूने वळविले. मतदारांना भाजप घराबाहेर काढण्यात यशस्वी झाला असला तरी एकप्रकारच्या दबावाच्या वातावरणाची जाणीव होत होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com