Goa Politics: ‘आप’ उमेदवार कायम ठेवणार का?

Goa Politics: भाजपचा सवाल : काँग्रेसशी सेटिंग असल्याने माघारीची शक्यता
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: दक्षिण गोव्यातून आम आदमी पक्षाने आमदार वेन्झी व्हिएगस यांची जाहीर केलेली उमेदवारी ते कायम ठेवणार की, कॉंग्रेससोबत हातमिळवणी (सेंटिंग) करून उमेदवारी मागे घेणार, अशी विचारणा भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

व्हिएगस यांची उमेदवारी मागे घेतली जाण्याचीच शक्यता अधिक आहे, असा अंदाजही त्यांनी वर्तविला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर केलेले भाषण ऐकले, तर कॉंग्रेसची सद्यस्थिती लक्षात येते. राहुल गांधी यांना अमेठी मतदारसंघ सोडून वायनाडला पळावे लागले, सोनिया गांधी राज्यसभेच्या जागेचा विचार करत आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांना तर निवडून येण्याची शाश्वतीच नाही.

गोव्यात तर कॉंग्रेसला न विचारताच ‘आप’ने उमेदवार जाहीर केला. ‘आप’वाले आरोप करतात आणि नंतर माफी मागतात, असा त्या पक्षाचा इतिहास आहे. यामागे काही तडजोड कऱण्याची त्यांची इच्छा असते. अशीच तडजोड करून ते व्हिएगस यांची उमेदवारी मागे घेणार का, हा प्रश्न आहे.

Goa Politics
Goa Accident Case: बालरथ झाडावर आदळून पाच विद्यार्थी जखमी

कॉंग्रेसचे विचाराल तर खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लोकसभेत गोव्याचे कोणतेही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. दिव्यांग व्यक्ती कार्यक्रमाला उशिरा पोचली म्हणून त्या व्यक्तीला वाहन देण्यास नकार दिल्यावरून एकदाच ते चर्चेत आले होते. एरव्ही त्यांची फारशी दखल कोणी घेत नाही.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, पाटकर यांना कॉंग्रेसमध्ये कोणीच गांभीर्याने घेत नाही. ते केवळ पदावर आहेत म्हणून थोडी दखल घ्यावी लागते. त्यांनी पक्षकार्याकडे अधिक लक्ष द्यावे. केवळ आरोप करण्यात वेळ घालवू नये.

Goa Politics
Arambol Illegal Construction: हरमल परिसरामध्ये 250 अवैध बांधकामे

न्याययात्रा ज्या ज्या ठिकाणी गेली, तेथे कॉंग्रेसची हानी झाली आहे. जो तो कॉंग्रेसमधून पळ काढत आहे, याचा विचार त्यांनी गांभीर्याने करावा. असाच सूर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लावला. ते म्हणाले की, काल सकाळी जन्मलेले राजकीय पक्ष कॉंग्रेसला वाकुल्या दाखवत आहेत.

एक-दोन जागा देऊ, असे कॉंग्रेसला सांगत आहेत. एवढी वाईट वेळ कॉंग्रेसवर कधीच आली नव्हती. निदान राज्यात कॉंग्रेसचा संघटनात्‍मक विचार प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी करावा. उगाच आरोप करू नयेत. त्यांच्या आरोपांना उत्तर देणे मी महत्त्वाचे मानत नाही. यावेळी माध्यम विभागाचे प्रभारी प्रेमानंद म्हांबरे उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com