Shilpa Mhamal: 'मी 10 वर्षांपासून भाजपासाठी काम करीत होते, पण..'! शिल्पा म्हामल फॉरवर्डमध्ये दाखल, पक्षांतराचे दिले कारण

Shilpa Mhamal Goa Forward Party: पणजीतील पक्षाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कळंगुटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Shilpa Mhamal Goa Forward Party
Shilpa Mhamal Goa Forward PartyDainik Gomanatk
Published on
Updated on

पणजी: भाजपच्या मांद्रेतील महिला कार्यकर्त्या शिल्पा म्हामल यांनी शुक्रवारी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांचे स्वागत केले. पणजीतील पक्षाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कळंगुटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

भाजप सोडण्यामागील कारण सांगताना म्हामल म्हणाल्या, सध्या भाजपमध्ये नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना अधिक मान-सन्मान दिला जात आहे. ज्यांनी पक्षासाठी काम केले आहे, त्या जुन्या कार्यकर्त्यांना पक्षात अजिबात विचारले जात नाही. केवळ एकाच मतदारसंघात अशी बाब नाही, तर सर्वच मतदारसंघांत असा प्रकार सुरू आहे.

Shilpa Mhamal Goa Forward Party
Goa Politics: खरी कुजबुज; घोडा काँग्रेसच्या वाटेवर?

मी दहा वर्षांपासून पक्षासाठी काम करीत होते, पण भाजपमध्ये अजिबात सन्मान दिला जात नाही. एसआयआर करू शकत नाही, असे सांगून मी भाजप सोडल्याचे सांगत त्यांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करीत आहे, असे जाहीर केले. यावेळी आमदार सरदेसाई यांनी राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदार भाजपला धडा शिकवतील, असा विश्वास करीत त्यांनी पर्तगाळ येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा आधार घेत राज्य सरकारवर टीका केली.

Shilpa Mhamal Goa Forward Party
Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरण संरक्षण व कारभाराविषयी ज्या बाबी सांगितल्या आहेत, ते राज्यातील मंत्रिमंडळाला टोमणे आहेत, हे भाजप सरकारने लक्षात घ्यावे, असेही नमूद केले. ते पुढे म्हणाले, म्हामल यांनी भाजप सोडण्यामागे जे कारण दिले आहे, ते भयंकर आहे. राज्यातील जनतेने मतदार पुनर्पडताळणी अर्ज व्यवस्थित भरावेत, असे आवाहन त्यांनी केले. एसआयआरच्या माध्यमातून सरकारकडून मते कापण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Amit Patkar Congress Criticism PM Modi
Sudin Dhavalikar MGP statement
Union Minister Ramdas Athawale during Goa political event
Goa NCRB Crime Report
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com