मगोपच्या कॅबिनेटला भाजप आमदारांचा विरोध

नाराज आमदारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, मगोपमुळे वातावरण तापलं
Sudin Dhavalikar MGP supports BJP
Sudin Dhavalikar MGP supports BJPDainik Gomantak

पणजी : गोव्यात अखेर भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. 11 दिवसांनंतर भाजपने विधीमंडळ नेत्याची निवड केली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या गळ्यातच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची माळ पडली असून त्यांनी राज्यपालांना आपल्याकडे 25 आमदारांच समर्थन असल्याचं कळवलं आहे. मात्र मगोपला सोबत घेतल्याने भाजपच्या आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

Sudin Dhavalikar MGP supports BJP
डॉ. प्रमोद सावंतच पुन्हा एकदा होणार गोव्याचे मुख्यमंत्री

राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर काही वेळातच भाजपच्या (BJP) आमदारांनी मगोप आणि सुदिन ढवळीकरांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध दर्शवला आहे. भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री भेट देत आपली नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. भाजपने मगोपला सोबत घेण्यासाठी आखलेली रणनीती मान्य नसल्याचं आमदारांचं म्हणणं आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मगोपच्या (MGP) आमदाराला दिलं जाणारं कॅबिनेट मंत्रिपद. मगोपला दिल्या जाणाऱ्या कॅबिनेट मंत्रिपदामुळे भाजपच्या मंत्रिपदामध्ये घट होणार आहे.

Sudin Dhavalikar MGP supports BJP
काँग्रेसने आधी विरोधीपक्षनेता ठरवावा, तानावडेंचं आव्हान

भाजप नेत्यांकडून मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वांच्या नजरा आता 12 कॅबिनेट मंत्रिपदांवर असून यातील एक मंत्रिपद मगोपला जाणार असल्याने धुसफुस वाढली आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) बुधवारी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपला 40 पैकी 20 जागा मिळाल्याने 3 अपक्ष आणि 2 मगोपच्या आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागला आहे. मगोपने आधीच दावा केला आहे की, भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला पाठिंब्यासाठी विचारणा झाली आहे. कॅबिनेट मंत्रिपदांमध्ये सुदिन ढवळीकरांसह, अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड आणि डॉ. चंद्रकांत शेट्येंना संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर माजी मुख्यमंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर, मॉविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, विश्वजीत राणे, रोहन खंवटे, आणि निलेश काब्राल यांचंही कॅबिनेट नक्की मानलं जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com