डॉ. प्रमोद सावंतच पुन्हा एकदा होणार गोव्याचे मुख्यमंत्री

भाजपतर्फे पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय झाला आहे.
Pramod Sawant once again became the Chief Minister of Goa
Pramod Sawant once again became the Chief Minister of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Pramod Sawant Will be the Chief Minister : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल येऊन बराच अवधी झाला आहे. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरुन या राज्यांमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. यातच गोव्यातही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश मिळाले आहे. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सुरु असलेली रस्सीखेच अखेर भाजपच्या विजयाने संपली.

दरम्यान,भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल मुरुगन भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि अंतिम निर्णय देण्यासाठी आज दुपारी गोव्यात दाखल झाले होते. केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेले नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, 'मी पक्षातील सर्व नेत्यांना विचारले, दुसरे कोणते नाव आहे का, तर सर्वांनी प्रमोद सावंत यांना पाठिंबा असल्याचा दावा केला.' आता त्यांची पुढील 5 वर्षांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडही झाली आहे.

दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री पदावरुन राज्यातील राजकीय नाट्य वेगाने बदलत होती. मात्र गोव्यात पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी बाजी मारत मुख्यमंत्री पदावर आपली मोहोर उमटवली आहे. मागील काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु होती. पण आता विश्वजित राणे यांची नाराजी दूर करत भाजपने प्रमोद सावंत यांची विधीमंडळ नेता म्हणून एकमताने निवड केली आहे. आता ते थोड्याच वेळात राजभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. (Pramod Sawant once again will be the Chief Minister of Goa)

या बैठकीला केंद्रीय निरीक्षक, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, सहप्रभारी सी.टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

प्रमोद सावंत म्हणाले, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, ज्यांनी मला पुढील पाच वर्षांसाठी गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. गोव्यातील जनतेने मला स्वीकारले याचा मला आनंद आहे. गोव्याच्या विकासासाठी जे काही शक्य आहे ते मी करेन.'

दरम्यान विश्वजीत राणेंची (Vishwajit Rane) मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा आता काही लपून राहिलेली नव्हती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीतही राणेंची नाराजी दूर झाली नसल्याचे एकंदरित चित्र दिसून आले होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद दिले जाणार असल्याची देखील चर्चा सुरु होती. यात उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदही दिले जाऊ शकते, असे भाजप सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपने राज्यात 20 जागा जिंकल्या आहेत. भाजपला एमजीपीच्या (MGP) दोन आमदारांचा आणि तीन अपक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे नव्या विधानसभेत संख्याबळाच्या बाबतीत भाजप बहुमताची स्थितीत आहे. पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर, सावंत लवकरच राजभवनात राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतील आणि नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com