Goa Tourism: भाजप आमदाराने गोवा सरकारची केली कान उघडणी, 'पर्यटन घटतंय', वेळीच जागे होण्याचा दिला सल्ला

Goa Tourism Decline: पर्यटकांच्या संख्येतील घट हा एक गंभीर इशारा आहे; असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले आहेत.
MLA Michael Lobo On Tourism Decline
BJP MLA Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्य सरकार पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे वारंवार सांगत असताना किनारी भागात महत्त्वाचे पर्यटन केंद्र असलेल्या कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. त्यांनी गोव्यात विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांची तातडीची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

मायकल लोबो यांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना प्रमुख समस्या मांडल्या. जसे की-समुद्रकिनाऱ्यांची दुरवस्था, असंघटित वाहतूक व्यवस्था आणि वाढता भटक्या कुत्र्यांचा त्रास. त्यांनी स्पष्ट केले की, त्वरित उपाययोजना न केल्यास गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 'पर्यटकांच्या संख्येतील घट हा एक गंभीर इशारा आहे.

MLA Michael Lobo On Tourism Decline
Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर पेडणे येथे अपघात, कोल्हापूरचा दुचाकी चालक गंभीर जखमी

आपण अधिक वेळ घालवू शकत नाही. भागधारकांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोष देणे थांबवले पाहिजे', असे लोबो म्हणाले. लोबो यांनी पर्यटनातील घसरणीमागील विविध कारणे नमूद केली. ते म्हणाले, 'कॅब अँग्रिगेटर आणि स्थानिक टॅक्सीचालक यांच्यातील संघर्षामुळे पर्यटकांसाठी प्रवास करणे अवघड बनले आहे.

रेण्ट-अ-कार सेवांचा अनियंत्रित विस्तार, ज्यावर अधिक कठोर नियमांची गरज आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, ज्यामुळे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेचा अभाव, जसे की नीट न ठेवलेले सार्वजनिक शौचालये आणि अयोग्य कचरा व्यवस्थापन. खांबांवरून लोंबकळणाऱ्या उघड्या इंटरनेट केबल्स, ज्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न तसेच सौंदर्यावर परिणाम होत आहे, असे लोबो म्हणाले.

MLA Michael Lobo On Tourism Decline
Viral Post: 'मी गोवा आणि भारताचा तिरस्कार करतो, राज्य सुरक्षित नाहीये, CM इतिहास पुन्हा लिहण्यात व्यस्त'; व्हायरल पोस्ट

९९ शॅक्सना 'कारणे दाखवा'

पर्यटन खात्याकडून राज्यात करण्यात आलेल्या पाहणीत ९९ शॅक्सकडून नियमभंग झाल्याचे आढळून आले. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तर गोव्यातील ८० तर दक्षिण गोव्यातील शॅक्सचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com