खून प्रकरणातला आरोपी, लग्नाच्या वाढदिवसासाठी चालला थायलंडला; ‘विशिष्ट परिस्थिती’मुळे न्‍यायालयाची परवानगी, काय आहे किस्सा? वाचा..

Sonali Phogat death case: सत्र न्यायालयाने सोनाली फोगट खून प्रकरणातील आरोपीला त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.
Sonali Phogat death case
Sonali Phogat death caseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सत्र न्यायालयाने सोनाली फोगट खून प्रकरणातील आरोपीला त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.

भाजपच्या महिला नेत्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरणातील आरोपी सुखविंदर याला ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत थायलंडमधील फुकेत आणि त्यानंतर दुबईला जाण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे.

सुखविंदरवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत गंभीर गुन्हा नोंद आहे. २०२२ मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून सध्या न्यायालयात आरोप निश्‍चितीची प्रक्रिया सुरू आहे. सुखविंदरने या कायदेशीर प्रकरणामुळे वैवाहिक संबंध बिघडत असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच पत्नीसोबतचे नाते सुधारण्यासाठी आणि १८ फेब्रुवारी रोजी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने विदेशी प्रवासाची मागणी केली होती.

Sonali Phogat death case
Goa Crime: 'पैसे भरा, भरपूर व्याज देऊ'! गुंतवणूकदारांना घातला 1.69 कोटींचा गंडा; हरिओम पतसंस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक

आरोपी परदेशातून पळून जाण्याची शक्यता आहे आणि खटल्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्याचे उपस्थित राहणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी ‘विशिष्ट परिस्थिती’ विचारात घेऊन सुखविंदरला प्रवासासाठी सशर्त परवानगी दिली.

Sonali Phogat death case
Goa Crime: अनोळखी क्रमांक घेतला, महिलेला पाठवला अश्लील मेसेज; 24 वर्षीय तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला

मागणीला सशर्त मान्यता

पासपोर्ट सध्या सीबीआयकडे असून तो प्रवासासाठी दिला जाईल.

रदेशातून परतल्यानंतर चार दिवसांत पासपोर्ट पुन्हा सीबीआयकडे जमा करावा लागेल.

प्रवासादरम्यान संपर्क क्रमांक आणि वास्तव्याचा पत्ता सीबीआयला देणे बंधनकारक.

यापुढे होणाऱ्या सुनावणीला न्यायालयात हजर राहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com