Goa AAP: ‘भाजपचा गुंडाराज गोव्यास नको’! आप राज्यभर राबवणार मोहिम; पालेकरांनी दिली माहिती

AAP Againts BJP: ‘भाजपचा गुंडाराज गोव्याला नको’ अशी मोहीम राबविली जाणार आहे. आजपासून त्याचा राज्यभर प्रारंभ होत असल्याची माहिती अमित पालेकर यांनी दिली.
pravin arlekar babu ajgaonkar
AAP Leader Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांकडून भाजपकडून राज्यात चालू असलेला गुंडाराज सर्वांनी पाहिला आहे. भाजपचा गुंडाराज बंद करण्यासाठी राज्यातील जनतेने चळवळ उभारणे आवश्यक आहे. या गुंडाराजविरोधात आम्ही ‘आप’च्यावतीने राज्यभर ‘भाजपचा गुंडाराज गोव्याला नको’ अशी मोहीम राबविली जाणार आहे. आजपासून त्याचा राज्यभर प्रारंभ होत असल्याची माहिती अमित पालेकर यांनी दिली.

पालेकर म्हणाले, राज्यात गोवा वाचविण्यासाठी जे झटतात, त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून कसा चालला आहे, हे सर्व जनतेने आता पाहिले आहे. रामा काणकोणकरचे स्वास्थ्य अजूनही ठीक नाही, अजूनही त्याला शारीरिक वेदना होत आहेत.

बोलताना त्याच्यात एकप्रकारची भीती दिसत आहे. तरीही वारंवार पोलिस रुग्णालयात जाऊन त्याला जबाब देण्यास सांगत आहेत. आता स्वप्नेश शेर्लेकर यांना भाजपचा जिल्हाध्यक्ष धमकावतो, यावरून भाजपचा गुंडाराज कसा फोफावला आहे, हे दिसते.

pravin arlekar babu ajgaonkar
Goa AAP: काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला, दिल्लीत धोका दिला, यापुढे सहकार्य नाही; गोव्यातील आप आमदारांनी स्पष्ट केली भूमिका

ते पुढे म्हणाले, भाजपचा हा गुंडाराज मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी ‘भाजपचा गुंडाराज गोव्यास नको’ अशी मोहीम आम्ही आता सुरू करीत आहोत. राज्यभर ही मोहीम राबविली जाईल. ताळगावातील आंदोलनाला विरोध केला म्हणून उलट ‘आप’ची सिसील रॉड्रिग्सविरोधात पोलिसांत तक्रार झाली, तत्पूर्वी आम्ही आमच्यावतीने पोलिसांत तक्रार दिली होती, पण तिची दखलच घेतली नाही.

pravin arlekar babu ajgaonkar
Goa AAP: डबल ट्रेकिंग विरोधात 'आप'ची व्यापक मोहीम, सडा येथून सुरवात, जागृती करणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष, युवा मोर्चाचे अध्यक्षामध्ये सत्तेचा अहंकार भरलेला आहे, त्यातूनच अशी दमदाटी केली जाते. त्यामुळे हा अहंकार उतरवणे आवश्यक आहे, असेही पालेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com