Goa AAP: डबल ट्रेकिंग विरोधात 'आप'ची व्यापक मोहीम, सडा येथून सुरवात, जागृती करणार

AAP campaign Vasco Goa: दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या रेल्वेमार्ग दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी आम आदमी पार्टीने वास्को मतदारसंघात मोहीम सुरू केली आहे.
Goa AAP
Goa AAPDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या रेल्वेमार्ग दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी आम आदमी पार्टीने वास्को मतदारसंघात मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी सडा जंक्शन येथे कोळसा वाहतुकीमुळे घराघरात शिरणारी धूळ आणि त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम यावर जागृती करण्यात आली.

आप नेते संदेश तेलेकर देसाई यांनी स्थानिक रहिवाशांच्या घरात स्विच बोर्ड व खिडकीवरील कोळशाची धूळ प्रत्यक्ष दाखवून सरकारच्या बेफिकिरीचे दर्शन घडवले. ही केवळ धूळ नाही, हा गोमंतकीयांचा संथ गतीने ओढवणारा मृत्यू आहे.

Goa AAP
Goa: दिवाडीत ‘कोटीतीर्थ कॉरिडॉर’! एक हजार मंदिरांचे प्रातिनिधिक स्मारक; संग्रहालयही उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

भाजप सरकार बेदरकारपणे रेल्वेमार्ग दुपदरीकरण प्रकल्प पुढे नेत आहे, जेणेकरून कोळशाची वाहतूक वाढेल. हा प्रकल्प आणण्यापूर्वीच वास्कोकरांचे जगणे असह्य झाले आहे. कुटुंबे त्रस्त आहेत, लहान मुले आजारी पडत आहेत. समाजातील दुर्बल घटक अधिक असुरक्षित होत आहेत. हा भाजपने राज्याला दिलेला वारसा आहे, असे देसाई म्हणाले.

Goa AAP
Goa Politics: सभापतिपदासाठी विरोधकांतर्फे काँग्रेस पक्षाचे एल्‍टन डिकॉस्‍टा, अर्ज सादर; विजय सरदेसाई, वीरेश बोरकरांच्या अनुपस्‍थितीमुळे चर्चा

घरोघरी जाणार

आप नेते घरोघरी जाऊन कोळसा वाहतुकीचे काळेकुट्ट वास्तव सर्वांसमोर दाखवणार आहे. भाजप सरकारची पोकळ आश्वासने आता उघड पडणार आहे.

आप नेते सुनील लोरान यांनी सांगितले की, राज्यात रोजगार निर्माण करणारे व शाश्वत विकासाला चालना देणारे उद्योग आवश्यक आहेत. मात्र भाजप सरकार कोळसा वाहतुकीची क्षमता वाढवण्यामध्ये व्यस्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com