

सासष्टी: संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २००५ साली ‘मनरेगा’ अंमलात आणली होती. या अंतर्गत गरिबांना कमीत कमी १२५ दिवसांचा रोजगार मिळत असे. पण भाजप सरकारने या योजनेचे नाव बदलून ‘विकसित भारत गॅरंटी रोजगार व अजिविका मिशन’ (ग्रामीण) ही योजना सुरू केली आहे. यामुळे गरिबांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. ‘मनरेगा’ पुनर्स्थापनेसाठी कॉंग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केले असून लोहिया मैदानावर एकदिवशीय उपोषण केले.
या आंदोलनात कॉंग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे सचिव डॉ. अंजली निंबाळकर, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष एम. के. शेख, दक्षिण गोवा जिल्हा समिती अध्यक्ष सावियो डिसिल्वा, स्थानिक नेते सावियो कुतिन्हो व चिराग नायक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.
खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले की महात्मा गांधीजी यांचा वारसा पुसून टाकण्याचे भाजप व आरएसएस यांचे षडयंत्र आहे. पण गांधीजींचे नाव सर्व देशबांधवांच्या हृदयात कोरले आहे व ते कदापी नष्ट होणार नाही. आम्ही मनरेगा पुर्नस्थापित करण्याचा प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता गरिब लोकांना ५० दिवसही रोजगार मिळणे कठीण होऊन बसले आहे, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी सांगितले. ही योजना बदलून गरिबांच्या पोटावर पाय ठेवण्याचा केंद्र सरकारचा हेतू कदापी साध्य होणार नाही, असेही आलेमाव यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारच्या कानावर गरिबांचा संविधानीक हक्क काढून घेतला जात आहे ही विरोधी पक्षांची हाक पोहोचावी म्हणून हे आंदोलन आहे व हे आंदोलन ‘मनरेगा’ योजना पुर्नस्थापित होईपर्यंत चालू राहणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. स्थानिक नेते सावियो कुतिन्हो यांनी या नवीन योजनेला विरोध करण्याचे पंचायतींना आवाहन केले आहे.
‘मनरेगा’ योजना पुर्नस्थापित करण्याची कॉंग्रेसची मागणी आहे. गरिबांचा रोजगार हक्क काढून घेण्याचा हा डाव आहे, असेही त्यांनी सांगितले. पूर्वी या योजने अंतर्गत केंद्रातर्फे राज्याला ९० टक्के अनुदान मिळत असे. आता त्यात बदल करुन ६० टक्के एवढे घटवले आहे व ४० टक्के खर्च राज्याने सोसावयाचा आहे. त्यामुळे गरीब व लहान राज्यांपुढे मोठा प्रश्न उपस्थित झाल्याचे
-माणिकराव ठाकरे, गोवा प्रभारी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.