MGNREGA Wages Hikes: मनरेगा अंतर्गत वेतनात मोठी वाढ; गोव्यात मजुरी दरात सर्वाधिक वाढ, कोणत्या राज्यात किती वाढ?

Government Hikes Wages Under MGNREGA: मनरेगाचे नवीन मजुरी दर 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील.
Wage Of Workers
Wage Of WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

Government Hikes Wages Under MGNREGA

केंद्र सरकारने बुधवारी मनरेगा अंतर्गत वेतनात वाढ जाहीर केली. सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत अकुशल मॅन्युअल कामगारांसाठी नवीन वेतन दर जाहीर केले आहेत. या अंतर्गत गोव्यात सर्वाधिक मजुरीत वाढ करण्यात आलीय.

गोव्यात मजुरीच्या दरात सर्वाधिक 10.56 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात सर्वात कमी 3.04 टक्के वाढ झाली आहे.

उत्तराखंडमध्ये 3.04 ने वाढ झाली आहे. मनरेगाचे नवीन मजुरी दर 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील.

अधिसूचनेनुसार, मनरेगा मजुरीचा सर्वोच्च दर (रु. 374 प्रतिदिन) हरियाणासाठी निश्चित करण्यात आला आहे. तर अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसाठी सर्वात कमी दर (रु. 234 प्रतिदिन) निश्चित करण्यात आला आहे.

चालू वर्षात (2023-2024) राज्यनिहाय वाढीबद्दल बोलायचे तर, गोव्यात 10.56 टक्के वाढ झाली आहे. यासह, आर्थिक वर्ष (2024-25) साठी गोव्याचे वेतन 356 रुपये प्रतिदिन झाले आहे. सध्या तो 322 रुपये प्रतिदिन आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात मनरेगाच्या मजुरीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकमध्ये नवीन मनरेगाचा दर 349 रुपये प्रतिदिन असेल. जो सध्याच्या 316 रुपये प्रतिदिन दरापेक्षा 10.44 टक्के अधिक आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यात 2024-25 साठी मजुरी दर 300 रुपये प्रतिदिन निश्चित करण्यात आले आहेत, चालू आर्थिक वर्षात 272 रुपयांच्या तुलनेत 10.29 रुपयांनी वाढले आहेत.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी मनरेगा अंतर्गत एकसमान मजुरी दर आहे. दोन्ही राज्यात सुमारे 10 टक्के वाढ झाली आहे. आता तो सध्याच्या 221 रुपयांवरून 243 रुपये प्रतिदिन होईल.

Wage Of Workers
Sanquelim News : सर्वण येथे जलवाहिनी पुन्हा फुटली; लाखो लिटर पाणी वाया

मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सारखाच आहे. या राज्यांमध्ये सध्या मनरेगा अंतर्गत दैनंदिन मजुरी 230 रुपये आहे. मात्र त्यात 3.04 टक्के वाढ करण्यात आली असून ती प्रतिदिन 237 रुपये होणार आहे.

आठ राज्यात पाच टक्क्यांपेक्षा कमी वाढ दिसून आली आहे. यामध्ये हरियाणा, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, राजस्थान, केरळ आणि लक्षद्वीपचा समावेश आहे. एकूणच, पगारात सरासरी 7 टक्के वाढ दिसून आली आहे.

2024-25 या आर्थिक वर्षातील सध्याचा सरासरी वेतन दर 267.32 रुपयांवरून 285.47 रुपयांपर्यंत वाढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com