BJP Goa : राज्यातील 1 लाख घरांवर फडकेल भाजपचा झेंडा : तानावडे

सेवा सप्ताहानिमित्ताने भाजपतर्फे 9 दिवस कार्यक्रम
SADANAND SHET TANAVADE
SADANAND SHET TANAVADEDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपतर्फे 6 ते 14 एप्रिल दरम्यान सेवा सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभर भरगच्च कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक, गोरख मांद्रेकर, महानंद अस्नोडकर, तुळशीदास नाईक उपस्थित होते.

SADANAND SHET TANAVADE
Virdi Dam Dispute: विर्डी’चा ‘वाळवंटी’च्या अस्तित्वाला धोका

तानावडे म्हणाले, आज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह कार्यकारणी सदस्य, मंडल अध्यक्ष, बुथ प्रमुख, विविध सेलचे अध्यक्ष सरचिटणीस यांची उपस्थिती होती.

यावेळी अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री सावंत यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि सर्वांना दिलासा देणारा आहे म्हणून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याबरोबरच कृषी विधेयक आणि कोमुनिदाद विधेयक सादर केल्याबद्दलही सरकारचे आभार मानण्यात आले.

६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून या दिवशी राज्यातल्या एक लाख घरांवर पक्षाचा झेंडा उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याच दिवशी शक्ती केंद्र आणि बुथ कार्यकर्त्यांच्या स्थानिक बैठका होतील.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. ७ एप्रिल रोजी युवा मोर्चाच्यावतीने रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येईल. ८ एप्रिल रोजी एससी, एसटी मोर्चाच्यावतीने आरोग्य शिबिर व या समाजासाठीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम होईल.

SADANAND SHET TANAVADE
Babush Monserrate: पणजीतील पेव्हिंग ब्लॉकच्या कामांवर महसूल मंत्री नाराज; PWD मंत्र्यांकडे तक्रार

९ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानुसार किसान मोर्चाच्या नियोजनाखाली शेतकऱ्यांचा सन्मान आणि भरडधान्याविषयी जनजागृती करण्यात येईल. १० एप्रिल रोजी महिला मोर्चाच्यावतीने एससी, एसटी मोर्चाच्यावतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन होईल. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्ताने ओबीसी मंडल मोर्चाचे कार्यक्रम होतील.

१२ एप्रिल रोजी वैद्यकीय सेलच्यावतीने रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन होईल. १३ एप्रिल रोजी राज्यातील जलस्त्रोतांची स्वच्छता, गणपती विसर्जनांची तळी, तलाव यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम होईल, तर १४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यात येईल. या कार्यक्रमाला काही विशेष पाहुणे निमंत्रित करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com