
पणजी: सध्याचा मगो पक्ष हा केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित आहे. तो भाऊसाहेबांचा पक्ष उरलेला नाही. आत्ताचा पक्ष भाऊसाहेबांचाच आहे हे दाखवून द्यायचे असेल, तर जीत आरोलकर किंवा अन्य बहुजन नेत्याला अध्यक्ष करा. आता जे मोठ्या तोंडाने सांगत आहेत ते पूर्वी काँग्रेसचे 'एजंट' म्हणून काम करत होते, अशी जोरदार टीका मंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी (३१ मार्च) केली.
भाजपला सध्याच्या 'मगो'सोबत युती करण्याची गरज नाही. भाजपने आदेश दिल्यास फोंडा तालुक्यातील सर्व जबाबदारी मी स्वीकारण्यास तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पणजीत पत्रकारांशी संवाद साधताना गोविंद गावडे यांनी मगोच्या काही नेत्यांवर आरोप करत मनातील खदखद व्यक्त केली.
गावडे म्हणाले की, "भाऊसाहेबांचा मगो पक्ष आणि आत्ताचा मगो वेगळा आहे. मगोपमधून अनेक बहुजन नेते बाहेर पडले आहेत. काशिनाथ जल्मी, स्व. लवू मामलेदार, नरेश सावळ, बाबू आजगावकर, दीपक पावसकर यांसारख्या नेत्यांनी मगोसाठी सर्वस्व वाहिले होते. तरीदेखील त्यांना पक्ष सोडावासा का वाटला, याचा विचार झाला पाहिजे. भाऊसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष हा तळागाळातील जनतेचा पक्ष होता. सध्याचा पक्ष माधवरावांच्या गोठ्यातील पक्ष झाला आहे."
'बैल आणि म्हशींनी टीका करू नये'
"माझ्या वडिलांनी, मी पूर्वी मगो पक्षासाठी काम केले होते. आता जे मोठ्या तोंडाने सांगत आहेत ते पूर्वी काँग्रेसचे एजंट म्हणून काम करत होते. १९९९ मध्ये हेच लोक काँग्रेसला मत द्या म्हणून प्रचार करत होते. मगोतील बैल आणि म्हशींनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी विचार करावा. कारण त्यांच्या राजकारणातील श्रीगणेशा मी करून दिला आहे", असे गोविंद गावडे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.