Konkan Railway: गोव्यात रेल्वेच्या धडकेत पश्चिम बंगालच्या युवकाचा मृत्यू, बोगद्यात सापडला मृतदेह

Goa News: सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर समीरचा मृतदेह दक्षिण गोवा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
goa railway news
Konkan RailwayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वेर्णा: रेल्वेने दिलेल्या धडकेत पश्चिम बंगालच्या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. कोंसूवा, वेर्णा येथे ही घटना घडली. मृत व्यक्ती पश्चिम बंगलाचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

समीर सदानंद माहतो (२३ रा. पश्चिम बंगाल) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीरचा मृतदेह दक्षिण गोव्यातील शवागरात ठेवण्यात आला आहे.

goa railway news
Goa Crime: डॉक्टरला लावला 1.26 कोटी रुपयांचा चुना; अस्तित्वात नसलेल्या बंगल्याची केली विक्री

मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर समीरचा मृतदेह दक्षिण गोवा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नाईक याप्रकरणाचा अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkan Railway Doubling project
Monsoon Withdrawal From Rajasthan
Pedne Crematorium Body
Nepal Flood Rescue Video
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com