पणजी : वाळपईवासीयांना आता भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) नकोशी झाली आहे. त्यांनी कोणतीच भरीव कामे न केल्याने येथील जनता या दोन्ही पक्षांना वैतागली आहे. राज्यातील जनतेसाठी ‘आप’ हाच योग्य पर्याय असून, लोकही आपच्या प्रचार मोहिमेत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे भाजप व कॉंग्रेसला जनता नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास आपचे उपाध्यक्ष सत्यविजय नाईक यांनी सांगितले.
वाळपई, कुठ्ठाळी कुंभारजुवा आणि सांतआंद्रे येथील प्रचारादरम्यान सत्यविजय नाईक बोलत होते. ते म्हणाले, दिल्लीवासी अनुभवत असलेल्या परिवर्तनाबद्दल लोकांना अनुभव येत आहे. शिक्षण क्षेत्रात केजरीवाल सरकार (Government) करत असलेल्या कामामुळे ते प्रभावित झाले आहेत. त्यामुळे गोव्यातही (goa) आपच्या अंतर्गत दिल्लीप्रमाणे कायापालट होईल, अशी लोकांना आशा आहे.
कुंभारजुवा मतदारसंघाचे आपचे नेते गोरखनाथ केळकर म्हणाले, मगो, काँग्रेस आणि आता भाजपने या ठिकाणी सत्ता चालवत आहे. पण, त्यांनी केवळ स्वतःच्या विकासासाठी काम केले आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्याच्या हिताचे निर्णय घेतले असून, 200 युनीटपर्यंत मोफत वीज, प्रति घर नोकऱ्या, मोफत तीर्थयात्रा, टॅक्सी चालकांसाठी महामंडळ आणि प्रत्येक 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना एक हजार रुपये मासिक भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात बदल पाहण्यासाठी एकवेळ आपला निवडून द्या, असेही केळकर म्हणाले.
गेल्या निवडणुकीत विद्यमान आमदारांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन जनतेची फसवणूक केली. आज ते सत्ताधारी पक्षात असूनही कोणताही विकास झालेला नाही. सांतआंद्रेमध्ये, बेरोजगारीचा दर जास्त असल्याने येत्या निवडणुकीत जनता कॉंग्रेस व भाजपला धडा शिकवेल, असे सांतआंद्रेचे आपचे प्रभारी नामदेव माशेलकर म्हणाले.
आतिशी मार्लेना आज गोवा दौऱ्यावर
आम आदमी पक्षाचेच्या गोवा प्रभारी आतिशी मार्लेना ह्या गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर शुक्रवारी येत आहेत. ते कळंगुटमध्ये घरोघरी प्रचार करणार असून, लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. शुक्रवारी दुपारी आतिशी मार्लेना ह्या पणजीतील आप कार्यालयात माध्यमांशी संवाद साधतील. त्यानंतर बाणावलीमध्ये घरोघरी प्रचारासाठी त्या आपच्या उपाध्यक्ष वेंझी व्हीएगस यांच्यासोबत घरोघरी प्रचार करणार आहेत. त्यानंतर फातोर्डा येथील परिवर्तन यात्रेत आप उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई यांच्या सभेस त्या उपस्थित राहणार आहेत.
कुठ्ठाळीतील बेरोजगारी संपवू
कुठ्ठाळी मतदारसंघात औद्योगिक वसाहत असूनही, कुठ्ठाळीतील लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे अनेक तरुणांना नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई, बंगळुरू आणि गोव्याबाहेरील इतर शहरांमध्ये जावे लागत आहे. राज्यात ‘आप’ची सत्ता आल्यावर राज्यातील मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी संपुष्टात येईल, असे आपचे नेते जोएल फर्नांडिस म्हणाले.
‘आप’च देईल गोवेकरांना समान संधी
राज्यातील बहुतेक टॅक्सीचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संकट काळात त्यांना सरकारकडून शून्य पाठिंबा मिळाला आहे. सांतआंद्रे येथील बेरोजगार तरुण नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. याला जबाबदार भाजप सरकार आहे. सरकारी नोकऱ्या उपलब्ध करण्यासाठी आप कार्यरत राहील. नोकऱ्या देताना कोणताही दुजाभाव केला जाणार आहे. गोवेकरांना आपच समान संधी देईल, असे आश्वासन सांतआंद्रेचे आपचे प्रभारी नामदेव माशेलकर यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.