देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशनंतर दुसरे कोणते राज्य चर्चेत असेल तर ते म्हणजे गोवा (Goa). गोव्याच्या राजकारणात (Goa Politics) गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) च्या पार्श्वभूमिवर दररोज खळबळ उडते आहे , जे सहसा दोन पक्षांचे राज्य होते, परंतु आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्याचे राजकारण तापत चालले आहे. पुर्वी आप (AAP) आणि टीएमसी (TMC) या दोन पक्षांनी गोव्यात आपले राजकारण सुरू केले, परंतु भाजप आता कॉंग्रेसला (Congress) सर्वात मोठा धक्का देत आहे. 7 डिसेंबर रोजी भाजपने (BJP) काँग्रेसचा आणखी एक आमदार फोडला आणि अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आला, आता काँग्रेसकडे केवळ तीन आमदार उरले आहेत. गोव्यात काँग्रेस कशी बरबाद झाली हे चित्र आता डोळ्यासमोर येत आहे.
गोवा काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी राज्य विधानसभेचा राजीनामा दिला. यापूर्वी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझन फालेरो यांनी सप्टेंबरमध्ये काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा दिला होता आणि नंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. आणि काल रवी नाईक यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस आमदारांचे संख्याबळ तीन झाले आहे.
काँग्रेस कशी उद्ध्वस्त झाली?
खरं तर, गोव्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 17 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. मात्र, 13 जागा जिंकणाऱ्या भाजपने किनारपट्टीच्या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांशी युती केली. तेव्हापासून अनेक काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, चोडणकर यांनी दावा केला की, नाईक यांनी पक्ष सोडल्यास काँग्रेसचे नुकसान होणार नाही, कारण ते "फक्त सांगण्यासाठी पक्षात उपस्थित होते. त्यांचा एक पाय आधीच भाजपमध्ये होता. त्यांनी यापूर्वी आपल्या मुलांना भाजपमध्ये पाठवले होते.
2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून अनेक काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वाळपोईचे आमदार विश्वजित राणे यांनी सर्वप्रथम काँग्रेसचा राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राणे सध्या राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. राणेंच्या बाहेर पडल्यानंतर लगेचच, आणखी दोन काँग्रेस आमदार - सुभाष शिरोडकर (शिरोडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे) आणि दयानंद सोपटे (मांद्रे) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पक्ष सोडला. त्यानंतर मे 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत दोघेही विजयी झाले.
जुलै 2019 मध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का कवळेकर सध्या प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत यांनी दिला. सध्या राज्यात काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, अलेक्सो रेजिनाल्डो आणि प्रतापसिंह राणे असे तीनच आमदार शिल्लक आहेत.
रवींचा होता दोन दगडांवर पाय!
फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या मुलानी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते फक्त काँग्रेसमध्ये ‘टेक्निकली’ होते. दोन दगडावर पाय ठेवून ते होते, त्यामुळे त्यांना गेले दीड वर्ष काँग्रेसने पूर्ण मोकळे सोडले होते. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांनाही बोलावण्यात येत नव्हते. काँग्रेसने फोंड्यामध्ये नवे नेतृत्व उभे केल्यानेच उमेदवार निवडीसंदर्भातच्या प्रक्रियेत पक्षाच्या गट समितीने त्यांचे नाव पाठविले नाही. पक्षावर ज्या आमदारांची निष्ठा नाही ते पक्षात नसलेले बरे. दुटप्पी धोरण असलेल्या नेत्यांना बाहेर ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नाईक यांच्या पक्षाच्या राजीनाम्यावर व्यक्त केली.
अशाप्रकारे गोवा विधानसभेत काँग्रेसची स्थिती खालावत चालली असून कालांतराने त्यांच्या आमदारांनीही पक्ष सोडला आहे. पण, पक्षाचे कठीण दिवस संपलेले नाहीत. गोव्यात आता काँग्रेससमोर फक्त भाजपचं आव्हान नाही, तर टीएमसी आणि आम आदमी पार्टीही आव्हान देत आहेत. भाजपपाठोपाठ गोव्यात काँग्रेसच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे, असे म्हणता येईल. राजकीयदृष्ट्या पक्षाला आता तीन आघाड्यांविरोधात मुकाबला करावा लागणार आहे. पण त्याआधी काँग्रेसला आपले घर बळकट करावे लागेल आणि पक्षाच्या नेत्यांना एका छताखाली एकत्र आणावे लागेल जे आताच्या परीस्थीतीत सर्वात मोठे आव्हान आहे. अन्यथा विटा घसरल्याने कॉंग्रेसची संपूर्ण इमारत ढासळ्याशिवाय राहणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.