BITS Pilani Student Suicide: पुन्‍हा थांबली स्‍वप्‍ने! 'बिट्स पिलानी'च्‍या आणखी एका विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या, पोलिसांकडून तपास सुरू

Arjun Sabu PHD Student Death:सांकवाळ येथील ‘बिट्‌स पिलानी’च्‍या आणखी एका विद्यार्थ्याने आत्‍महत्‍या केल्‍यामुळे खळबळ माजली आहे
BITS Pilani Student Suicide
BITS Pilani Student SuicideDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सांकवाळ येथील ‘बिट्‌स पिलानी’च्‍या आणखी एका विद्यार्थ्याने आत्‍महत्‍या केल्‍यामुळे खळबळ माजली आहे. अर्जुन साबू (२६) असे त्‍याचे नाव आहे. दरम्‍यान, मागच्‍या दोन वर्षांत या शैक्षणिक संस्‍थेच्‍या सात विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. तर ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या तणावातून कुडतरीत विद्यार्थ्याने मृत्‍युला कवटाळल्‍याने हळहळ व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

अर्जुन साबू हा ‘बिट्‌स पिलानी’ कॅम्पसमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत होता. त्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली. अर्जुन हा केरळचा रहिवासी असून, तो कॅम्पसपासून काही अंतरावरील एका इमारतीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने ‘आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये’ असे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे.

BITS Pilani Student Suicide
NEET PG Goa: गोव्यात पहिला, तर भारतात 212 वा क्रमांक! आंजनेयने उंचावली ‘गोमेकॉ’ची प्रतिष्ठा; नीट-पीजी परीक्षेत दैदिप्यमान यश

घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविला. अर्जुन साबू हा पीएचडीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. काही काळ तो बिट्स कॅम्पसमध्ये राहिला; मात्र नंतर त्याने कॅम्पसबाहेर फ्लॅट भाड्याने घेतला होता. पीएचडी विद्यार्थ्यांना कॅम्पसबाहेर राहण्याची परवानगी असल्याने त्याचा कॅम्पसशी संबंध केवळ वर्ग आणि शैक्षणिक कामापुरताच असतो.

आज सकाळी तो राहत असलेल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. ही घटना कॅम्पसबाहेर घडली असली तरी अर्जुन बिट्सचा विद्यार्थी असल्याने संस्थेच्या व्यवस्थापनाला मोठा धक्का बसला आहे. तो मानसिक तणावाखाली होता की अन्य काही कारण होते, याचा तपास वेर्णा पोलिसांकडून सुरू आहे.

BITS Pilani Student Suicide
NEET Exams: गोव्यात आयुर्वेदसाठी १०० जागा तर १४ सप्टेंबर पासून अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची दुसरी फेरी सुरु...

या सलग घटनांनंतर बिट्स व्यवस्थापन आणि शिक्षकवर्ग सतर्क झाला असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांना समुपदेशन, मानसिक आधार तसेच नियमित संवादाच्या माध्यमातून तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या कॅम्पसमध्ये परीक्षा सुरू असल्याने शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. परीक्षा १६ मे रोजी संपणार असून, तोपर्यंत कोणतीही अनिष्ट घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

मात्र, अर्जुन साबूच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग आत्महत्यांमुळे वाढती चिंता अलिकडच्‍या काळात ‘बिट्‌स पिलानी’च्‍या सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनांमुळे विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव, शैक्षणिक दबाव आणि समुपदेशन व्यवस्थेची गरज यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

BITS Pilani Student Suicide
NEET Paper Leak: NEET पेपर लीकप्रकरणी सीबीआयची धडक कारवाई, झारखंडमधून पत्रकाराला अटक; गुजरातमध्ये सात ठिकाणी छापेमारी

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व सतर्कता उपाय .विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी ‘बिट्स’ व्यवस्थापनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांशी नियमित संवाद, मानसिक आरोग्य समुपदेशन, तणाव व्यवस्थापन सत्रे आणि विशेष निरीक्षण यावर भर दिला जात आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकवर्ग विशेष सतर्क असतो.

‘बिट्‌स पिलानी’च्‍या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेची दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा समितीकडून तातडीने दखल घेण्यात आली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. पान १५ वरपार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतल्याने तो मानसिक तणावाखाली गेला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

BITS Pilani Student Suicide
NEET Exam Scam: ‘NDAच्या रावणराज्याच्या विरोधात विद्यार्थी शक्ती एकवटली’; नीट परीक्षा घोट्याळ्यावरुन आलेमाव यांचा हल्लाबोल

या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस निरीक्षक कपिल नायक पुढील तपास करत आहेत. वडील रेल्वेत गार्ड ,मृत विद्यार्थी मूळचा बंगळुरू येथील असून, त्याचे वडील रेल्वेत गार्ड म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी त्याची आई आणि बहीण मूळ गावी गेल्या होत्या. वडील घरी आल्यानंतर मुलाने आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सध्या हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंदविले असून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे.

‘संकुल प्रभाव’ म्‍हणजे नेमके काय? :

यापूर्वीच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये विद्यार्थ्यांमधील मानसिक नैराश्य हे प्रमुख कारण आढळून आले होते. शिवाय ‘संकुल प्रभाव’ (Cluster Effect) ही शक्यता नाकारता येत नाही. एका ठिकाणी आत्महत्येची घटना घडल्यानंतर त्याच परिसरात अशा घटनांची साखळी तयार होण्‍याची शक्‍यता असते. तशी मानसिक स्‍थितीच निर्माण झालेली असते. ‘बिट्स’मधील घटना त्याच स्वरूपाच्या असू शकतात, असे एग्ना क्लिटस यांनी नमूद केले.

BITS Pilani Student Suicide
Viral Video: 'मुल कसे जन्माला येते, ते प्रत्यक्ष दाखवा', NEET विद्यार्थ्याच्या प्रश्नाला शिक्षिकेचे सडेतोड उत्तर

‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटणे ही दुर्देवी घटना आहे. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढू शकतो. केंद्र सरकार या प्रकरणी निश्‍चितच योग्‍य मार्ग काढेल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com