NEET Exam Scam: रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा प्रभूरामाने हनुमानाला लंकेत पाठवले. तिथे रावणाच्या राक्षसांनी हनुमानाला पकडून त्याच्या लांब शेपटीला आग लावली. या दु:साहसाचा परिणाम म्हणजे हनुमानाने संपूर्ण लंका जाळली आणि रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका झाली.
देशातील विद्यार्थी (Student) हे हनुमानाच्या शेपटीसारखे आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या रावणराज्याचा पराभव करण्यासाठी भगवान हनुमानाच्या शक्तीने विद्यार्थी एकत्र आले आहेत, अशी गर्जना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
दरम्यान, गोवा प्रदेश काँग्रेस (Congress) समितीने आझाद मैदान, पणजी येथे आयोजित केलेल्या आंदोलनात ते बोलत होते. कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस अहराज मुल्ला, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी, वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख, महिला कॉंग्रेस अध्यक्षा बिना नाईक, शंभू भाऊ बांदेकर, मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर आणि काँग्रेसचे अन्य पदाधिकारी आणि एनएसयूआयचे सदस्य मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी नीट परीक्षा घोटाळ्यावर भाजप सरकारच्या निष्क्रियतेबद्दल निषेध केला. नीट परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काँग्रेस पक्ष हा मुद्दा संसदेत उपस्थित करेल असे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. आमचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, असेही ते पुढे म्हणाले.
एनएसयूआयचे राज्य अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी सरकारने नीट परीक्षा रद्द करण्याबाबत कारवाई केली नाही तर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया 24 जून 2024 रोजी संसदेचा “घेराव” करेल असे यावेळी बोलताना जाहीर केले.
काँग्रेसचे पदाधिकारी तुलिओ डिसोजा, गुरुदास नाटेकर, एव्हरसन वालिस, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर तसेच इतर आणि एनएसयूआय गोवाचे सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या विरोधात सर्वांनी घोषणाबाजी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.