Goa Bison Attack: भोम-देवसू येथे गव्याची दुचाकीला धडक, महिला गंभीर जखमी

Bhom Devsu Accident: भोम-देवसू येथे शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास गव्याने दुचाकीला धडक दिल्याने जुलिया कट्टमणी (३०) या महिला गंभीर जखमी झाल्या.
Bhom Devsu Accident
Goa Bison AttackDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: भोम-देवसू येथे शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास गव्याने दुचाकीला धडक दिल्याने जुलिया कट्टमणी (३०) या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून स्थानिकांनी त्यांना तातडीने खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलिया कट्टमणी या पेडण्याहून माईण, कोरगाव येथील आपल्या घरी दुचाकीवरून जात होत्या. यावेळी अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

Bhom Devsu Accident
Goa Accident: मध्यरात्रीच्या काळोखात घात!कोलवाळमध्ये टेम्पोला दुचाकीची जोरदार धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

त्यामुळे त्या दुचाकीसह रस्त्यावर फेकल्या गेल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेऊन जखमी महिलेला मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com