Birch Nightclub Fire : आरोपींचा कुणालाही मारण्याचा हेतू नव्हता! 'बर्च' प्रकरणी कोर्टाचे निरीक्षण; समानतेच्या तत्वानुसार लुथरा बंधूंना जामीन

Arpora Birch Nightclub Fire: ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला लागलेल्या भीषण आग प्रकरणात, अटकेत असलेले संशयित सौरभ आणि गौरव लुथरा या संशयितांना म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Luthra Brothers Bail News
Arpora Birch Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

Luthra Brothers Bail : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला लागलेल्या भीषण आग प्रकरणात, अटकेत असलेले संशयित सौरभ आणि गौरव लुथरा या संशयितांना म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील गुंतागुंत आणि तपासाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत न्यायालयाने वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला.

बीएनएस कलम १०५ (२) अंतर्गत हा गुन्हा ‘सदोष मनुष्यवध’ नोंदवला असला, तरी आरोपींचा कोणालाही मारण्याचा हेतू नव्हता, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवून अमानवीय श्रेणीत मोडत नाही,असेही निरीक्षण नोंदवले.

दोषारोपपत्र दाखल झाल्याने स्थितीत कायदेशीर बदल झाला असून, आरोपींना कोठडीत ठेवणे अनावश्यक आहे,असेही न्यायालयाने म्हटले.

Luthra Brothers Bail News
Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

४ हजारहून अधिक पानांचे आरोपपत्र!

न्यायालयाने आपल्या आदेशात प्रामुख्याने नमूद केले की, यापूर्वीचा जामीन अर्ज फेटाळला गेला, तेव्हा तपास सुरू होता. मात्र, आता पोलिसांनी ४ हजार पेक्षा जास्त पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून त्यात ३०६ साक्षीदारांची यादी आहे.

नियमित हजेरीचे निर्देश

न्यायालयाने प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला.साक्षीदारांवर दबाव टाकू नये,या अटीसह संशयितांना मुक्त करण्याचे आदेश दिले, त्यांना पोलिस स्थानकात नियमित हजेरीचे निर्देशही दिले.

Luthra Brothers Bail News
Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

बनावट ‘एनओसी’ प्रकरणी जामिनावर उद्या निवाडा

हणजूण येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबसाठी दारू परवाना मिळवताना बनावट ‘ना-हरकत’ दाखला सादर केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या गौरव आणि सौरभ लुथरा या बंधूंच्या भवितव्याचा निर्णय आता बुधवार, ८ रोजी होणार आहे.

म्हापसा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल बुधवारपर्यंत राखून ठेवला आहे. सोमवारी, झालेल्या सुनावणीत लुथरा बंधूंच्या वतीने ॲड. पराग राव यांनी युक्तिवाद केला. संशयित पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत. शिवाय, दोघांचेही पासपोर्ट आधीच निलंबित केले असल्याने ते देश सोडून जाण्याची शक्यता नाही, असे ॲड. राव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com