Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

Luthra Brothers Arrested: मात्र आता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर यश आले.
Luthra Brothers
Luthra Brothers Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमधील भीषण अग्निकांडाने राज्यासह संपूर्ण देश हादरला होता. मात्र आता या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर यश आले. थायलंडहून प्रत्यार्पण केल्यानंतर या दोघांना मंगळवारी (16 डिसेंबर) दिल्लीत आणण्यात आले. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने गोवा पोलिसांना या दोघांची 'ट्रान्झिट रिमांड' मंजूर केली असून उद्या बुधवारी (17 डिसेंबर) सकाळपर्यंत त्यांना गोव्यात आणले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 6 डिसेंबरच्या मध्यरात्री हडफडे (Arpora) येथील नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासानुसार, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि फायर एक्झिटची कमतरता यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, ज्यावेळी क्लबमध्ये आग लागली आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत होते, त्याच्या काही तासांतच म्हणजेच 7 डिसेंबरच्या पहाटे लुथरा बंधूंनी गुपचूप मुंबईहून थायलंडसाठी विमान पकडले आणि देश सोडून पळ काढला होता.

Luthra Brothers
Famous Night Club In Goa: गोव्यात नाइट आऊटचा प्लॅन करताय? तर मग 'या' दोन क्लबना भेट दिलीच पाहिजे

थायलंडहून प्रत्यार्पण

लुथरा बंधू फरार झाल्यानंतर गोवा पोलिसांनी (Goa Police) त्यांच्याविरोधात 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी केली होती आणि त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले होते. भारतीय तपास यंत्रणांनी थायलंड सरकारशी समन्वय साधून त्यांना फुकेत येथून ताब्यात घेतले. आज त्यांना विमानाने दिल्ली विमानतळावर आणताच गोवा पोलिसांनी अधिकृतपणे त्यांना ताब्यात घेतले.

Luthra Brothers
Goa Night Club: नाईटक्लबच्या कारवाईबाबत कळंगुट सरपंच सिक्वेरा म्हणाले, 'अशा कारवाईमुळे....'

न्यायालयाची भूमिका आणि रिमांड

आरोपींना आज दिल्लीतील न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आले. "गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असून तपासासाठी आरोपींची कोठडी आवश्यक आहे," असा युक्तिवाद गोवा पोलिसांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही आरोपींना गोव्यात नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मंजूर केली. आता गोवा पोलीस त्यांना उद्या न्यायालयात हजर करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com