Goa Night Club
Goa Night ClubDainik Gomantak

Goa Night Club: नाईटक्लबच्या कारवाईबाबत कळंगुट सरपंच सिक्वेरा म्हणाले, 'अशा कारवाईमुळे....'

Goa Night Club: गोव्यावर प्रेम करणारे पर्यटक कळंगुटला नक्कीच येतील- सिक्वेरा
Published on

Goa Night Club: मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर कळंगुटच्या अधिकाऱ्यांनी निर्णायक पाऊल उचलत गुरुवारी रात्री 11 बेकायदेशीर नाईटक्लब बंद केले. या कारवाई बद्दल कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी समाधान व्यक्त केलेय.

''खरं तर ही कारवाई खूप आधीच होण्याची गरज होती. ऑगस्टपासून कळंगुट ग्रामस्थांनी सर्व संबंधित विभागाला अनेक पत्र पाठवून किनारीभागात चाललेले प्रकार बंद करण्याबाबत विनंती केली होती असे सिक्वेरा म्हणाले.

Goa Night Club
Goa Tourism 2023: 'वॉटर स्पोर्ट्स'ला जाताय मग या गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजे!

यासंबंधी बोलताना ते म्हणाले, त्यावेळी कलेक्टर, पोलीस, बीडीओ कोणाचेही आम्हाला सहकार्य लाभले नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर ही कारवाई होतेय याबाबत समाधान आहे. पंचायतीने अशा प्रकारच्या कोणत्याही night club ला परमिशन दिलेली नाही.

तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील 'ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांची आस्थापन सील करण्यात येणार' असल्याचे याबाबत आधीच सांगितले होते. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आलीय.

पर्यटकांच्या आगमनावर परिणाम होणार का?

पत्रकारांनी 'पर्यटकांच्या येण्यावर काही परिणाम होईल का', असे विचारल्यावर सिक्वेरा म्हणाले, गोव्यावर प्रेम करणारे पर्यटक कळंगुटला नक्कीच येणार. नाईट क्लब सील बंद केले म्हणून पर्यटकांच्या येण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

उलट कळंगुटमधील टाऊट्स मुळेच पर्यटकांना त्रास होत होता. परंतु आता यापुढे पर्यटकांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईमुळे राज्यात न्याय्य व्यवस्था सक्रिय असून या निर्णयामुळे आम्ही सर्वजण खुश आहोत. बेकायदेशीर नाईटक्लबमुळे गोव्याची प्रतिमा फार खराब होत चालली असून सरकारने आणि संबंधित विभागाने या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com