Arpora: बर्च अग्निकांड’ प्रकरणी नवी अपडेट! हडफडेच्या सरपंच, सचिवांची हायकोर्टात धाव; अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु

Arpora Nightclub Fire: म्हापसा येथील सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.
Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी/म्हापसा: बहुचर्चित ‘बर्च अग्निकांड’ प्रकरणात अडकलेले हडफडे-नागोवाचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

म्हापसा येथील सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. या प्रकरणाची बुधवारी (ता.७) सुनावणी होणार आहे.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, न्यायालयाच्या निर्णयानंतरच या दोघांच्या अटकेबाबतचे चित्र स्पष्ट होईल. सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संबंधित हे प्रकरण असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

‘बर्च’मधील भीषण आग प्रकरणात प्रशासकीय हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप या दोघांवर ठेवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने रोशन रेडकर यांना सरपंच पदावरून अपात्र ठरवले होते,

तर सचिव रघुवीर बागकर यांना नोकरीवरून बडतर्फ केले होते. म्हापसा सत्र न्यायालयाने यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून सध्या दोघेही भूमिगत आहेत. अटक टाळण्यासाठी दोघांनीही स्वतंत्रपणे उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

अजय गुप्ताच्या बनावट आरोग्य दाखला प्रकरणातील जामीन अर्जावरील सुनावणीवेळी आज पीडित जोशी कुटुंबीय न्यायालयात हजर राहिले. सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांसमोर या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भेटीची त्यांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हे प्रकरण ‘फास्ट-ट्रॅक’ पद्धतीने मार्गी लावावे, अशी मागणी जोशी कुटुंबीयांनी केली. यावेळी जोशी कुटुंबीय या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चारही पीडितांच्या तसबिरी हाती घेऊन न्यायालयाबाहेर उभे होते.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना जोशी कुटुंबीयांचे वकील विष्णू जोशी म्हणाले की, बर्च दुर्घटना व बनावट आरोग्य दाखल्याचा तपास सध्या प्रारंभिक टप्प्यात आहे. अशावेळी संशयितांना जामीन मिळणे तपासाला मारक ठरेल. त्यामुळे संशयितांचे जामीन फेटाळावेत, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत.

Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub Fire: "सरपंचाला का बनवताय बळीचा बकरा?" बिर्च बाय रोमिओ दुर्घटनेबाबत सरदेसाईंचा रोखठोक सवाल; विधानसभेत उठवणार आवाज

जोशी कुटुंबीयांची हस्तक्षेप याचिका मंजूर

बनावट आरोग्य दाखला प्रकरणात अजय गुप्ता याच्या जामिनावरील सुनावणी २० जानेवारीपर्यंत तहकूब केली. या जामीन अर्जावर दिल्लीतील पर्यटक पीडित जोशी कुटुंबीयांनी हस्तक्षेप याचिका सादर केली असून न्यायालयाने ती मंजूर केली आहे.

Arpora Nightclub Fire
Birch Nightclub Fire: "मोठ्या लोकांना टाळले, कामगारांना अडकवले"! 'बर्च'प्रकरणी अ‍ॅड. पोरोबांचा युक्तिवाद; वाचा सविस्तर मुद्दे..

लुथरा बंधूंच्या जामिनावर उद्या होणार सुनावणी

‘बर्च अग्निकांड’ प्रकरणातील संशयित लुथरा बंधूंनी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावरील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार आहे. तसेच म्हापसा पोलिस स्थानकात लुथरा बंधूंविरोधात दाखल केलेल्या बनावट आरोग्य दाखलाप्रकरणी दोघांच्याही अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com