Luthra Brothers: फरशीवरती झोप, रोज साधे जेवण! 'बर्च' प्रकरणातील लुथरा बंधूंचा थाट संपला; बनावट NOC प्रकरण अद्याप मानगुटीवर

Goa Nightclub Fire: : राजेशाही थाटात विलासी जीवन जगणारे ‘बर्च बाय रोमियो लेन’चे मालक गौरव व सौरभ हे लुथरा बंधू कायद्याच्या कचाट्यांत अडकले आहेत.
Birch Nightclub Fire Case
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

Luthra Brothers Fake NOC Case : राजेशाही थाटात विलासी जीवन जगणारे ‘बर्च बाय रोमियो लेन’चे मालक गौरव व सौरभ हे लुथरा बंधू कायद्याच्या कचाट्यांत अडकले आहेत. सध्‍या ते कोठडीत असून सामान्य कैद्यांप्रमाणेच मुकाट्याने सकाळी भाजी-पाव आणि दुपारी-रात्री साधे शाकाहारी जेवण घेत आहेत.

ज्यांच्या एका इशाऱ्यावर नोकराचाकरांचा लवाजमा नाचायचा त्‍या लुथरा बंधूंची स्‍थिती सध्‍या हलाखीची बनली आहे. घटनेनंतर थायलंडमध्ये लपून बसलेल्या या संशयितांना गोवा पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करून भारतात आणले. गेल्या साडेतीन महिन्यांच्या कोठडीने त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण चकाकी हिरावून घेतली आहे.

आलिशान बेडवर लोळणाऱ्या या बंधूंना आता कोठडीतील थंड आणि कडक फरशीवर रात्र काढावी लागतेय. कोणताही महागडा मेनू किंवा परदेशी पेये नाहीत; उलट इतर सामान्य कैद्यांप्रमाणेच सकाळी भाजी-पाव आणि दुपारी-रात्री साधे शाकाहारी जेवण त्यांना मुकाट्याने घ्यावे लागत आहे.

कोठडीत कोणताही हट्ट किंवा नखरा चालत नसल्याने या ‘हाय-प्रोफाईल’ संशयितांना परिस्थितीशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सध्या लुथरा बंधू म्हापसा पोलिस स्थानकाच्या कोठडीत आहेत.

आरोग्याच्या तक्रारींमुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना सध्या गादी आणि एका टेबल फॅनची सवलत देण्यात आली आहे. औषधोपचारांच्या आधारावर ते कोठडीत दिवस ढकलत आहेत.

Birch Nightclub Fire Case
Luthra Brothers: म्‍हापसा पोलिसांकडून 'लुथरा बंधूं'ना अटक! बनावट NOC प्रकरण; 5 दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, बर्च अग्निकांड प्रकरणात जामीन मंजूर झाल्याचे समजताच त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद स्पष्ट झळकत असल्याचे पोलिससूत्रांनी सांगितले. जरी मुख्य अग्निकांड प्रकरणात त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी ‘बनावट एनओसी’ प्रकरण अद्याप त्यांच्या मानगुटीवर बसलेले आहे.

या प्रकरणात नियमित जामिनासाठी त्यांचे वकील कायदेशीर झुंज देत आहेत. लुथरा बंधू लवकरच मोकळ्या हवेत श्‍‍वास घेणार की त्यांच्या अडचणी आणखी वाढणार, हे आता न्यायालयाच्या पुढील निर्णयावर अवलंबून आहे.

Birch Nightclub Fire Case
शेतजमिनी, डोंगर सगळेच कत्तल करून 'बिल्डर लॉबी'ला विकायला लागलो तर इमारतीची जंगले विस्तारतील; आकारवाड्यातील वनराईची श्रीमंती

हनुमान चालिसा, नामजपाचा आधार!

या कायदेशीर लढाईत लुथरा बंधूंचे नातेवाईक न्यायालयात प्रत्‍येक वेळी हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे, जेव्हा न्यायालयात सुनावणी सुरू असते, तेव्हा लुथरा कुटुंबातील महिला नातेवाईक ‘हनुमान चालिसा’ पठण आणि नामजप करताना दिसतात. संकटात सापडलेल्या या बंधूंना आता कायद्याच्या लढाईसोबतच दैवी शक्तीचाही आधार घ्‍यावा लागतोय, हे चित्रच खूप काही सांगून जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com