Tragic Death: दुर्दैवी घटना! विजेचा खांब उभारताना कोसळला, बिहारच्या कामगाराचा कुडतरीत मृत्यू; निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

Bihar worker death Curtorim: कुडतरी येथे सिमेंटचा विद्युत खांब उभारताना तो अंगावर कोसळून बिहार येथील कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Bihar worker death Curtorim
Bihar worker death CurtorimDainik Gomantak
Published on
Updated on

कुडतरी: कुडतरी येथे सिमेंटचा विद्युत खांब उभारताना तो अंगावर कोसळून बिहार येथील कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गौरव कुमार (वय अंदाजे २८) असे मृत कामगाराचे नाव असून, हा अपघात २३ जानेवारी रोजी झाला होता.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघाताच्या वेळी गौरव कुमार हा विद्युत खांब बसविण्याच्या कामात सहभागी होता.

खांब उभारत असताना तोल जाऊन तो अचानक खाली कोसळला आणि थेट गौरव कुमार याच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी तातडीने मदत करत त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याचा जीव वाचू शकला नाही.

Bihar worker death Curtorim
Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी बांधकामस्थळावरील पर्यवेक्षकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा उपाययोजना न केल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरू असून बांधकामस्थळावरील सुरक्षिततेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.

Bihar worker death Curtorim
Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com