वाठादेव येथे कचऱ्यामुळे रस्ताच गायब! रोगराईची भीती; बगलमार्गावरील सेवा रस्ता झालाय ब्लॅक स्पॉट

Bicholim Vathadev garbage issue: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात काही भागात कचऱ्याची समस्या कायम असून वाठादेव भागात तर ही समस्या दिवसेंदिवस भयानक बनत आहे.
Bicholim Vathadev garbage issue
Bicholim Vathadev garbage issueDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात काही भागात कचऱ्याची समस्या कायम असून वाठादेव भागात तर ही समस्या दिवसेंदिवस भयानक बनत आहे. वाठादेव येथे बगलमार्गाजवळील सेवा रस्त्यावर तर कचरा टाकण्याचे प्रकार फारच वाढले आहेत. या कचऱ्यामुळे सेवा रस्त्याचे अस्तित्व संकटात आले आहे.

वाठादेव येथील ओव्हरब्रीज जवळील सेवा रस्त्यावर तर सुक्या बरोबरच ओलाही कचरा टाकण्यात येत आहे. तसेच सॅनेटरी पॅडचा देखील खच पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

Bicholim Vathadev garbage issue
Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

वाठादेव येथील सेवा रस्त्यावर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कचरा पसरलेला आहे. कचऱ्यामुळे सेवा रस्ता चक्क गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या या सेवा रस्त्यावर प्रचंड प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे या रस्त्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या जवळपास एक वर्षापासून ही समस्या आहे, अशी माहिती अब्दुल रहीम या नागरिकाने दिली.

Bicholim Vathadev garbage issue
South Goa Hotel Inspection: हडफडेच्या आगीचा धसका! दक्षिण गोव्यातील 15 हॉटेल्स-पब्जकडे NOC चं नाही, तपासणीत मोठा खुलासा

दंडात्मक कारवाई आवश्यक

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील कारापूर-तिस्क, कुळण, गोकुळवाडा, न्यूवाडा, वाठादेव सर्वण आदी भागात कचऱ्याची समस्या कायम आहे. कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध हॉट स्पॉटवर जाळी बसविण्याचा पंचायतीचा प्रयोग फसला आहे.

त्यामुळे रस्त्याच्या बाजूने कचरा फेकणाऱ्यांचे आयतेच फावले आहे. ''कचरा टाकू नका'' असा संदेश देणारे सूचना फलकही काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र त्याचाही फायदा होत नाही. कचरा समस्या नियंत्रणात आणायची असल्यास स्थानिक पंचायतीने कचरा फेकणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com